तुमच्याही हाताचे कोपरे झाले आहेत काळे, मग आजच करा ‘हे’ घरगुती उपाय

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Lighten Elbows Home Remedies : प्रत्येक व्यक्तीसाठी त्यांची सुंदरता ही महत्त्वाची असते मग ती महिला असो किंवा मग पुरुष… प्रत्येक व्यक्ती सुंदर दिसण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे आपण पाहतो. वेगवेगळे प्रोडक्ट्स वापरण्यापासून घरगुती उपायपर्यंत सगळ्याच गोष्टी करूण काही फरक जाणवतो आहे का हे जाणून घेण्याचा प्रयत्न प्रत्येक व्यक्ती करत असते. पण बऱ्याचवेळा अनेकांचे लक्ष हे आपल्या हाताच्या कोपऱ्यावर लक्ष देत नाहीत. जर तुम्हालाही असं वाटतं की तुमच्या हाताचे कोपरे स्किन टोन प्रमाणे लाइट व्हावे तर जाणून घ्या काय करायला हवे. 

हळद आणि लिंबू 
हळद आणि लिंबूची पेस्ट लावून हाताऱ्या कोपरला ही पेस्ट लावा. त्यानं कोपरला असलेला काळपटपणा कमी होईल. ही पेस्ट हाताच्या कोपरला लावत असताना त्याची थोडी जाड लेअर लावा. ही पेस्ट 15-20 मिनिटं राहू द्या आणि जेव्हा ती पेस्ट सुकल्यानंतर स्क्रब करत साफ करा. हळदीत असलेले करक्यूमिन शरीरातील मेलेनिनची वाढ थांबेल आणि अशा प्रकारे तुमच्या कोपरचा रंग लाइट होईल. 

लिंबू
लिंबू हे नॅच्युरल ब्लीचिंग एजंट आहे. याचा वापर करून तुम्ही डेड स्किन काढून टाकू शकता. त्यात व्हिटॅमिन सी असते जे डेड स्किनला काढून टाकून स्किन टोन लाइट करण्यास मदत करते. त्याप्रमाणे नवीन पेशी तयार होण्यास मदत करते. कसा वापरला लिंबू, लिंबू कापून आपल्या हाताच्या कोपरवर मसाज करा त्यानंतर काही वेळ राहु द्या आणि नंतर पाण्यानं धुवून काढा आणि काही वेळात थंड पाण्यानं स्वच्छ धुवून काढा. 

हेही वाचा : 57 व्या वर्षी लग्न केल्याने ट्रोल करणाऱ्यांना Ashish Vidyarthi यांनी सुनावलं; म्हणाले, “मला बुड्ढा खूसट…”

बटाट्याचा रस 
बटाट्याचा रसचा वापर केला तर तुमच्या हाताचे कोपऱ्यांचा स्किन टोन हा लाइट होण्याची शक्यता आहे. बटाट्याचा रस काढून हाताच्या कोपरवर 10 ते 15 मिनिटांसाठी लावा. साफ केल्यानंतर त्यावर तुम्ही मॉइश्चराइजर लावा. त्यानं काळपटपणा निघून जाईल. 

टोमॅटो 
टोमॅटोचा वापर करून तुम्ही काळ्या कोपरापासूनही सुटका मिळवू शकता, टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए मोठ्या प्रमाणात असते. त्यात त्वचा उजळ करण्याची क्षमता आहे. यामध्ये असलेले लाइकोपीन त्वचेचा रंग सुधारते. त्याचा वापर करण्यासाठी टोमॅटो मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. त्यानंतर 20 मिनिटे त्याचे पेस्ट ही कोपरावर लावून ठेवा. काही वेळाने पाण्याने स्वच्छ धुवून काढा. आठवड्यातून तीनदा वापरल्याने कोपराचा काळेपणा दूर होईल.

बेकिंग सोडा
बेकिंग सोडा एक क्लिन्झरप्रमाणे काम करते. त्यात त्वचा उजळण्याचे गुणधर्म असतात. यामुळे पिगमेंटेशनची समस्या दूर होऊन ज्या ठिकाणी काळपटपणा आला आहे, त्या ठिकाणी दुधात बेकिंड सोडा मिसळून लावा आणि ही पेस्ट 20 मिनिटांनंतर कोमट पाण्याने धूवुन काढा.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

Related posts