Ram Mandir Ayodhya Cheap and cool accommodation with all amenities for just Rs 650 in ramjanmabhumi ayodhya marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ram Mandir Ayodhya : प्रभू श्रीरामांची (Lord Shri Ram) येत्या 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा होतेय. यासाठी संपूर्ण अयोध्या नगरी सज्ज झाली आहे. या ठिकाणी भाविकांचा मेला अगदी पाहायला मिळतोय. संपूर्ण वातावरण अगदी भक्तिमय आणि उत्साही पाहायला मिळतंय. अयोध्या (Ayodhya) नगरीसुद्धा पूर्णपणे बदलतेय. अयोध्यामध्ये रामभक्तांच्या सेवेत राहण्यासाठी पहिली डॉर्मेटरी आणि भव्य फूडकोर्ट व्यवस्था तयार करण्यात आली आहे. अयोध्येत तयार करण्यात आलेली ही पहिली डॉर्मेटरी आहे. यासाठी राम भक्तांना फक्त 650 रूपयांत या डॉर्मेटरी सुविधेचा लाभ घेता येणार आहे. 

अयोध्येत भव्य फूड कोर्ट

डॉर्मेटरीबरोबरच सगळ्यात मोठं असं भव्य फूड कोर्ट देखील तयार करण्यात आलं आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जर तुम्ही आयोध्येत येत असाल किंवा तुम्ही आला असाल आणि जर तुम्हाला राहण्याची सोय होत नसेल तर याच अयोध्येत पहिली डॉर्मेटरी सुविधा सुरू करण्यात आली आहे. ज्यामध्ये फक्त साडेसहाशे रुपये देऊन तुम्ही जवळपास सर्व सुविधांचा लाभ घेऊ शकणार आहात. 

अरुंधती फूड अँड हॉस्पिटल सर्विसेस…

अरुंधती फूड अँड हॉस्पिटल सर्विसेसच्या माध्यमातून या डॉर्मेटरीबरोबर अयोध्यामध्ये सर्वात मोठं फूड कोर्ट तयार करण्यात आलं आहे. या फूड कोर्टमध्ये साडेतीनशेपेक्षा अधिक लोक भोजनासाठी बसू शकतात

मोठ्या शहरांप्रमाणे अयोध्या नगरीही बदलतेय 

ज्याप्रमाणे मुंबई, दिल्ली आणि लखनऊ सारख्या मोठ्या शहरांत सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्या प्रमाणे अयोध्येतही या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि त्यामुळेच मागील वर्षभरात  आयोध्या पूर्णपणे बदललेली पाहायला मिळतीये

चार मजली मल्टीलेव्हल पार्किंगचीही सोय

अयोध्यानगरी पूर्णपणे बदलतेय आणि त्यातच सोहळ्याच्या वेळी किंवा भविष्यात सुद्धा रामभक्तांची वाढती संख्या पाहता वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पहिल्यांदाच अयोध्येत चार मजली मल्टीलेव्हल पार्किंगची सोय करण्यात आली आहे. या ठिकाणी मल्टीलेव्हल पार्किंगबरोबरच रूफ टॉप हॉटेल आणि फूड मॉलचं सुद्धा काम पूर्ण होतंय.

पाहा व्हिडीओ : 

महत्त्वाच्या बातम्या :

अयोध्येला जाण्यासाठी मोफत बस तिकीट? लवकरच लाभ घ्या, ऑफर मर्यादित कालावधीसाठी

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts