Putrada Ekadashi 2024 : पौष पुत्रदा एकादशी ‘या’ राशींसाठी वरदान! प्रगतीसोबत बँक बॅलेन्समध्ये भरघोस वाढ

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Paush Putrada Ekadashi 2024 :पौष शुद्ध एकादशीला पुत्रदा एकादशी व्रत करण्यात येतं. यादिवशी द्विपुष्कर योग, शुक्ल योग, ब्रह्मयोग आणि रोहिणी नक्षत्र यांचा शुभ संयोग जुळून आला आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार हे शुभ संयोग काही राशींसाठी वरदान ठरणार आहे. पौष पुत्रदा एकादशी काही राशींसाठी धनलाभ घेऊन आला आहे. (Paush Putrada Ekadashi 2024 is a boon for these zodiac signs A substantial increase in bank balance with progress)

मेष रास (Aries Zodiac) 

या राशीच्या लोकांसाठी पुत्रदा एकादशी चांगली असणार आहे. ही लोक कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवणार आहेत. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय केलात तर तुम्हाला चांगला नफा मिळणार आहे. तुमच्या व्यवसायाचा विस्तारही करणार आहात. कुटुंबातील सदस्याकडून चांगली बातमी मिळणार आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आहे. जर तुम्ही आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्येने त्रस्त असाल तर तुमचं आरोग्य चांगल असणार आहे. 

सिंह रास (Leo Zodiac) 

पुत्रदा एकादशी ही या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. या राशीचे लोक कौटुंबिक जबाबदारी पेलण्यात यशस्वी होणार आहेत. नशिबाच्या पाठिंब्याने अडकलेला पैसाही वसूल करणार आहात. तुमचं सर्व काम पूर्णत: यशस्वी होणार आहेत. तुम्ही तुमच्या व्यवसायात तुमचं स्थान सुरक्षित करण्यात यश मिळणार आहे. सूर्यदेवाच्या कृपेने तुमचा आत्मविश्वास खूप उंचावणार असून तुम्ही जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश संपादन करणार आहात. तुम्हाला तुमच्या आई-वडिलांची सेवा करण्याची संधी मिळणार आहे. 

वृश्चिक रास (Scorpio Zodiac)  

पुत्रदा एकादशी या राशीच्या लोकांसाठी शुभ सिद्ध होणार आहे. वृश्चिक राशीच्या लोकांना एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीचे मार्गदर्शन मिळणार आहे. थोड्या प्रयत्नाने त्यांचं कार्य यशस्वी होणार आहे. तुम्हाला तुमच्या मित्रांना मदत करण्याची संधी मिळणार आहे. व्यवसायही कोणत्याही अडचणीशिवाय चांगल यश मिळवणार आहे. या राशीचे नोकरदार लोक रविवारच्या सुट्टीचा पुरेपूर आनंद घेणार आहेत. तुम्ही तुमचा जोडीदार आणि मुलांसोबत कुठेतरी बाहेर जेवायला जाण्याचा बेत आखणार आहात. 

मकर रास (Capricorn Zodiac) 

पुत्रदा एकादशी या राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरणार आहे. ही लोक आनंदावर खर्च करणार आहात. चांगल्या व्यवसायामुळे तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होणार आहे. तुम्ही कुटुंबातील सदस्यांसोबत खरेदीच्या मूडमध्ये असणार आहात. व्यवसायात वाढ झाल्याने समाधान मिळेल आणि व्यावसायिक सहली देखील पूर्णपणे यशस्वी होणार आहे. कामात उत्साह राहील आणि प्रत्येक टप्प्यावर कौटुंबिक सहकार्य मिळणार आहे. 

मीन रास (Pisces Zodiac) 

पुत्रदा एकादशी या लोकांसाठी चांगली असणार आहे. मीन राशीच्या लोकांच्या बोलण्यात अधिक स्पष्टता आणि गोडवा असणार आहे. जमीन आणि इमारतीशी संबंधित अडथळे दूर होणार आहे. ज्यामुळे तुम्हाला आराम मिळणार आहे. घरामध्ये कोणत्याही धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन होणार आहे. रविवारच्या सुट्टीमुळे तुम्ही मित्रांसोबत मौजमजा करण्याच्या मूडमध्ये असणार आहात. 

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Related posts