Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Ram Mandir gets wrapped in flowers decoration ahead of ayodhya Ram Mandir Inauguration

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ayodhya Ram Mandir : अयोध्येमध्ये भव्य प्रभू श्रीराम मंदिरात (Ram Temple) रामललाच्या (Ram Lalla) अभिषेक आणि प्राणप्रतिष्ठा (Pran Pratishtha ) कार्यक्रमाला आता फक्त एक दिवस उरला आहे. याआधी राम मंदिरात (Ram Temple) विशेष विधी सुरू आहेत. आज राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासंबंधित विधींचा सहावा दिवस आहे. आज रविवारी प्रभू श्रीरामाच्या मूर्तीला 114 कलशांच्या पाण्याने स्नान घालण्यात येणार आहे. आज रामललाच्या मंडपाचीही पूजा केली जाणार आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.

114 कलशांतील पाण्याने रामललाला स्नान

रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने ट्विटमध्ये लिहिलं आहे की, ‘रविवारी प्रस्थापित देवतांची दैनंदिन पूजा, हवन, पारायण, पहाटे मध्‍वधिवास, 114 कलशांतील विविध औषधी पाण्याने मूर्तीचे स्नान, महापूजा, उत्सव, मूर्तीच्या प्रसादाची प्रदक्षिणा, शय्याधिवास, तत्लन्यास, महान्यास. तेथे आदिन्य, शांत-पोषक – अघोर होम, व्याहती होम, रात्री जागरण, संध्याकाळची पूजा आणि आरती होईल.’

रामलला मंदिराच्या गाभाऱ्यात विराजमान

अयोध्या रामभक्तांच्या गर्दीने गजबजलेली पाहायला मिळत आहे. रामललाचा बहुप्रतिक्षित प्राण प्रतिष्ठा, अभिषेक सोहळा आणि मंदिराचा भव्य उद्घाटन सोहळा सोमवारी पार पडणार आहे. प्राणप्रतिष्ठा आणि उद्घाटना पूर्वीचा उत्साह अयोध्यानगरीत दिसून येत आहे. याआधी शुक्रवारी म्हैसूरचे प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवलेली श्री रामललाची मूर्ती मंदिराच्या गर्भगृहात ठेवण्यात आली होती. गुरुवारी गर्भगृहात घटस्थापना सोहळ्यादरम्यान तोंड झाकलेल्या रामललाच्या मूर्तीचा पहिला फोटो समोर आला. 

 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts