( प्रगत भारत । pragatbharat.com)
Weekly Career Horoscope 22 to 28 January 2024 : या आठवड्याचा पहिला सोमवार 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात रामलल्ला विराजमान होणार आहे. त्यात या आठवड्यातील महालक्ष्मी योग आणि लक्ष्मी नारायण योग काही राशींसाठी आर्थिक लाभ घेऊन आला आहे. या आठवड्यात कोणा कोणावर रामलल्लाचा आशीर्वाद बरसणार आहे जाणून साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य. (weekly horoscope money career prediction 22 to 28 January 2024 surya gochar 2024 laxmi narayan yog will give money and success arthik rashi bhavishy zodiac sign)
मेष (Aries Zodiac)
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक बाबतीत फायदेशीर ठरणार आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी प्रगती होणार आहे. या आठवड्यात केलेल्या प्रवासातून तुम्हाला शुभ लाभ मिळणार आहे. तुम्हाला तुमच्या नातेवाईकांकडून लाभ मिळणार आहे. आरोग्यात सुधारणार दिसणार आहे. कामाच्या ठिकाणी वास्तववादी राहून निर्णय घेणे तुमच्यासाठी शुभ ठरणार आहे. या आठवड्यात एखाद्या स्त्रीमुळे तुमचा खिशा खाली होणार आहे. कुटुंबातील तरुणामुळे अडचणी वाढणार आहे.
शुभ दिवस: 25,26
वृषभ (Taurus Zodiac)
या राशीच्या लोकांना या आठवड्यात आर्थिक लाभ मिळणार आहे. या आठवड्यात तुम्ही केलेल्या व्यावहारिक कामाचा फायदा होणार आहे. तुम्हाला कुटुंबातील एखाद्या मोठ्या व्यक्तीचं समर्थन मिळणार आहे. तब्येतीत बरीच सुधारणा होणार आहे. या आठवड्यात केलेल्या प्रवासाचे शुभ परिणाम तुम्हाला मिळणार आहे. आठवड्याच्या शेवटी काही शंका असतील तरी लवकरच तुमच्या आयुष्यात आनंदाचा क्षण येणार आहे. या आठवड्यात तुमचा अधिक खर्च होणार आहे.
शुभ दिवस: 23,24,25,26
मिथुन (Gemini Zodiac)
या राशीचे लोक त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रगती करणार आहेत. गेल्या आठवड्यात तुम्ही केलेल्या मेहनतीमुळे या आठवड्यात यश मिळणार आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कुठेतरी प्रवासाची योजना आखणार आहात. आर्थिक बाबींमध्ये सर्वसमावेशक दृष्टिकोन ठेवून निर्णय घेतल्यास चांगले परिणाम मिळणार आहे. या आठवड्यात कौटुंबिक प्रश्न परस्पर चर्चेने सोडवणार आहात. या आठवड्यात तुम्ही सहली पुढे ढकलल्यास चांगले परिणाम होणार आहे. आठवड्याच्या शेवटी जीवनात सुख-शांती लाभणार आहे.
शुभ दिवस: 23,26
कर्क (Cancer Zodiac)
या राशीचे लोक त्यांच्या कामाच्या ठिकाणी सुधारणा दिसणार आहे. तुमच्या हातातील प्रकल्पात यश मिळणार आहे. आर्थिक लाभाची चांगली संधी मिळणार असून गुंतवणुकीतून यश लाभणार आहे. पैशाशी संबंधित प्रकरणांमध्ये थोडा संयम ठेवून कोणताही निर्णय घेतला तुमच्या हिताच ठरणार आहे. प्रवासासाठी हा आठवडा शुभ असणार आहे. कुटुंबात सुसंवाद राहणार असून नशीब तुमच्या बाजूने असणार आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबासह चांगल्या ठिकाणी शिफ्ट होण्याचा निर्णय घेणार आहात.
शुभ दिवस: 22,24,25
सिंह (Leo Zodiac)
या राशीच्या लोकांसाठी आर्थिक बाबतीत काळ अनुकूल असणार आहे. तुम्हाला धनलाभ होणार आहे. कामाच्या ठिकाणी या आठवड्यात तुम्ही केलेली मेहनत तुम्हाला भविष्यात यश मिळवून देणार आहे. आपण कुटुंबावर लक्ष केंद्रित केल्यास चांगले परिणाम मिळणार आहे. परस्पर प्रेम अधिक दृढ होणार आहे. या आठवड्यात तुम्हाला एखाद्या नवीन ठिकाणी प्रवास करावासा वाटेल. आठवड्याच्या शेवटी एक नवीन सुरुवात तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धीच्या शुभ संधी घेऊन येईल.
शुभ दिवस: 22,24,26
कन्या (Virgo Zodiac)
या राशीचे लोक त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रगती करणार आहेत. कोणताही नवीन प्रकल्प तुमच्यासाठी यशाचा मार्ग उघडणार आहे. या आठवड्यात तुम्ही विवाह समारंभात सहभागी होणार आहात. आर्थिक बाबतीत प्रगतीच्या शुभ संधी लाभणार आहे. तुम्हाला कुटुंबात सामान्य शांतता जाणवणार आहे. या आठवड्यात ट्रिप दरम्यान एखाद्या तरुण व्यक्तीबद्दल अधिक चिंता तुम्हाला पडणार आहे. तुम्ही सहली पुढे ढकलल्यास बरे होणार आहे. आठवड्याच्या शेवटी काही प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असून थोडं सावध राहा.
शुभ दिवस: 22
तूळ (Libra Zodiac)
या राशीच्या लोकांना या आठवड्यात अपेक्षित लाभ मिळणार आहे. या आठवड्यात तुम्हाला कामावर दोनपेक्षा जास्त प्रकल्प आकर्षक करणार आहेत. मात्र तुम्ही त्यापैकी फक्त एकच कार्यान्वित करू शकणार आहात. तुम्ही तुमच्या मनाचे ऐकून निर्णय घेतल्यास तुम्ही अधिक यशस्वी होणार आहात. हा आठवडा संयमाने कोणताही निर्णय घेण्याचा आठवडा असणार आहे. तुमच्या गुंतवणुकीकडे लक्ष द्या अन्यथा तुम्हाला जास्त खर्च करावा लागणार आहे. आर्थिक बाबींचा ताण जास्त असणार आहे. कुटुंबातील वडिलधाऱ्या व्यक्तीबद्दल चिंता वाढणार आहे. या आठवड्यात, सहलींदरम्यान महिलांच्या समस्या वाढणार आहेत.
शुभ दिवस: 22,26
वृश्चिक (Scorpio Zodiac)
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घेतल्यास फायदेशीर ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या मनाचे ऐकून निर्णय घेणे तुमच्या हिताचे असणार आहे. प्रवासातून सुखद अनुभव मिळणार आहे. प्रवास यशस्वी होणार असल्याने मन प्रसन्न असणार आहे. या आठवड्यात आर्थिक खर्च जास्त होणार आहे. तुमच्या गुंतवणुकीकडे लक्ष देण्याची गरज असणार आहे. तुमच्यापैकी काहींसाठी, मुलाच्या बाबतीतही मतभेद होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे, अन्यथा भविष्यात तुम्हाला दीर्घकाळ त्रास सहन करावा लागेल.
शुभ दिवस: 25,26
धनु (Sagittarius Zodiac)
या राशीच्या लोकांना या आठवड्यात तुम्ही जितके विचारपूर्वक निर्णय घ्याल तितके तुम्ही यशस्वी होणार आहात. या आठवड्यात तुम्हाला धनप्राप्तीच्या शुभ संधी मिळणार आहे. या आठवड्यात तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या सहवासात खूप निवांत असणार आहात. तुम्हाला एक सुखद अनुभव मिळणार आहे. या आठवड्यात केलेल्या प्रवासात तुम्हाला यश मिळवून देणार आहे. तुम्ही एखाद्या सुंदर ठिकाणी जाण्याचा बेत आखणार आहात. कामाच्या ठिकाणी भागीदारीतील कोणत्याही कामाबद्दल तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे. नुकसानही सहन करावे लागू शकतो.
शुभ दिवस: 22,23,25,26
मकर (Capricorn Zodiac)
या राशीच्या लोकांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी सुधारणा दिसणार आहे. तरुणांच्या मदतीने ते त्यांच्या प्रकल्पांमध्ये यश मिळणार आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत थोडे चिंतेत असणार आहात. जीवनात सुख-समृद्धीचे योगायोग असणार आहे. आर्थिक बाबींमध्ये तुम्हाला नुकसान सहन करावं लागणार आहे. प्रवासादरम्यान त्रास होणार असल्याने तो पुढे ढकलणे हिताचं ठरले. आठवड्याच्या शेवटी वेळ अनुकूल असणार आहे.
शुभ दिवस: 23,26
कुंभ (Aquarius Zodiac)
या राशीचे लोक त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रगती करणार आहेत. तुमचा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी तुम्हाला या आठवड्यात अनेक संधी मिळणार आहेत. आर्थिक बाबींमध्ये, मात्र खर्च अधिक होणार आहे. तुम्हाला गुंतवणुकीकडे लक्ष देणे गरजेचं आहे. या आठवड्यात तुम्हाला प्रवासात यश मिळणार आहे. कौटुंबिक बाबींमध्ये तुम्हाला हवे असलेले बदल साध्य करण्यासाठी तुम्हाला अधिक वेळ लागणार आहे. आठवड्याच्या शेवटी तुम्ही भावनिकदृष्ट्या अस्वस्थ असू शकता.
शुभ दिवस: 23, 25
मीन (Pisces Zodiac)
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक बाबींसाठी शुभ असणार आहे. आर्थिक लाभासाठी मजबूत परिस्थिती निर्माण होणार आहे. नोकरीच्या ठिकाणी भागीदारीत केलेले काम तुमच्यासाठी शुभ परिणाम घेऊन येणार आहे. परस्पर प्रेम दृढ होणार असून प्रेम जीवन आनंददायी असणार आहे. प्रियजनांच्या सहवासात आनंददायी वेळ व्यतित करणार आहात. या आठवड्यात तुम्हाला प्रवासाचे फायदे देखील होणार आहेत. जीवनात आनंद आणि समृद्धी असणार आहे. या आठवड्यात तुम्ही एखाद्या स्त्रीच्या आरोग्याबाबत चिंतेत असणार आहेत. आठवड्याच्या शेवटी आनंद तुमच्या आयुष्यात दार ठोठावणार आहे.
शुभ दिवस: 24,24,26
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)