मुंबईत मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागर‍िकांचे सर्वेक्षण; BMC चे मुंबईकरांना अवाहन

( प्रगत भारत । pragatbharat.com)

देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई:  मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागर‍िकांच्या सर्वेक्षणाचे कामकाज 23 जानेवारी पासून सुरू होणार आहे. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या आदेशानुसार करण्यात येणारे हे सर्वेक्षण बृहन्मुंबई महानगरपाल‍िका क्षेत्रात देखील करण्यात येणार असून यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचा सहयोग असणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अध‍िकारी व कर्मचारी मुंबई शहर आण‍ि मुंबई उपनगर या दोन्ही जिल्ह्यात सर्वेक्षण करणार आहेत. त्यामुळे या प्रशासकीय कामासाठी आपल्या घरी, अपार्टमेंट मध्ये, सोसायटीत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना योग्य ते सहकार्य करा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपाल‍िका प्रशासनाकडून करण्यात येत आहे (Maratha reservation).

राज्यभरात सुरू होणाऱ्या हे सर्वेक्षण मंगळवार (द‍िनांक २३ जानेवारी २०२४) पासून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेतात सुरू होणार आहे. यासाठी महानगरपाल‍िकेचे अध‍िकारी आण‍ि कर्मचाऱ्यांना प्रगणक व पर्यवेक्षकाचे प्रश‍िक्षण देण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या आदेशानुसार निर्धारित करण्यात आलेले प्रश्न या प्रगणक व पर्यवेक्षकांकडून नागरिकांना व‍िचारण्यात येणार आहेत. या माध्यमातून आवश्यक ती माहिती गोळा करण्यात येणार आहे.

या सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर प्रश‍िक्ष‍ित कर्मचारी मंगळवारपासून आपल्या घरी, सोसायटी आण‍ि अपार्टमेंटमध्ये येतील. संबंध‍ित कर्मचाऱ्यांकडे स्वत:चे ओळखपत्र असेल. त्यामुळे सर्वेक्षणासाठी येणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपाल‍िकेच्या कर्मचाऱ्यांना मुंबईकरांनी सहकार्य करावे आण‍ि त्यांना अपेक्ष‍ित असलेली माह‍िती भरून दयावी. ही माहिती भ्रमणध्वनीवर आधारित एका ॲपमध्ये नोंदविण्यात येणार असून माहिती नोंदविल्यानंतर माहिती देणाऱ्याची स्वाक्षरी देखील ॲप मध्ये ज़तन केली जाणार आहे. तरी कृपया बृहन्मुंबई महानगरपाल‍िका हदीतील रह‍िवाशांनी या सर्वेक्षणासाठी सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे करण्यात येत आहे.

मराठा सर्वेक्षणाचं काम युद्धपातळीवर सुरू असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती 

मराठा आरक्षणासाठी सरकार सकारात्मक असून, मागासवर्ग आयोगाचंही काम जोरात सुरू आहे. तसंच मराठा सर्वेक्षणाचं काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदेंनी दिली…यासोबतच मराठा आरक्षणासंदर्भात फेब्रुवारीत विशेष अधिवेशन बोलावण्यात आले. त्यामुळे जरांगेंनी आंदोलन थांबवावं असं आवाहन शिंदेंनी केले.

तर मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर जरांगेंनी अनेक सवाल उपस्थित केले आहेत. 54 लाख नोंदी सापडल्या मग प्रमाणपत्र द्यायला हरकत काय?…सगे सोय-यांचा वटहुकूम काढून प्रमाणपत्र द्या…हक्काचं सोडून पळत्याचं मागं आम्ही का पळायचं? अशी मागणी जरांगेंनी केलीय.

 

 

Related posts