world breastfeeding week know personal hygiene tips for breastfeeding mothers in marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com)

World Breastfeeding Week : आई आणि बाळाचं नातं खूप खास असतं. पहिल्यांदा आई होताना महिलेच्या मनात असंख्य प्रश्न असतात. त्यावेळी या नवीन आईला (mothers) कोणाची ना कोणाची मदत हवी असते. कारण या नवीन नवीन आईकडे बाळासोबतच्या गोष्टींचा कुठल्याही अनुभव नसतो. मग अशावेळी बाळ का रडतंय, त्याला कधी दूध द्यायचं, बाळा स्तनपान करण्याची योग्य पद्धत काय असे अनेक प्रश्न तिला पडत असतात. मग अशावेळी आज आम्ही तुम्हाला स्तनपानसंदर्भात काही खास टीप्स देणार आहेत. (world breastfeeding week know personal hygiene tips for breastfeeding mothers in marathi) 

1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा आठवड्या जागतिक स्तनपान आठवडा (world breastfeeding week) म्हणून राबविण्यात येतो. बाळासाठी आईचं दूध किती महत्त्वाचं आहे यासाठी या आठवड्यात जनजागृती करण्यात येत. आई आणि बाळासाठी स्तनपान (breastfeeding) हा महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामुळे आई जेव्हा बाळाला स्तनपान करते त्यावेळी तिने काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्या. अन्यथा तिच्या काही चुका या दोघांच्याही आरोग्यासाठी चांगलं नाही. 

1. हात स्वच्छ ठेवा

कोको रिसर्च सेंटरनुसार, बाळाला स्तनपान करण्यापूर्वी आणि केल्यानंतर आईने हात स्वच्छ धुतले पाहिजे. कारण हात स्वच्छ न धुतल्यास हाताला असणारे जंतू हे बाळापर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे बाळाला संसर्ग होण्याचा धोका असतो. 

2. ब्रेस्ट वाइप्सने बेस्ट काय साफ करा

बाळाला स्तनपान करताना ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. बाळाला स्तनपान करताना बेस्ट कोमट पाण्याने किंवा ब्रेस्ट वाइप्सने साफ केले पाहिजे. त्यानंतरच बाळाला दूध दिले पाहिजे. कारण बाळाला स्तनपान करताना स्वच्छता फार महत्त्वाची आहे. नाही तर बाळाच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. आजकाल बाजारात अनेक गोष्टी उपलद्ध आहेत. व्हिटॉमिन इ आणि ग्लिसरीनयुक्त असे ब्रेस्ट वाइप्स मार्केटमध्ये मिळतात. या वाइप्सचा वापर केल्यास ब्रेस्ट निरोगी राहण्यास मदत होते. 

3. साफसफाईची काळजी घ्या

नवजात बाळासोबत आईनेही स्वच्छतेची काळजी घेणे फार महत्त्वाचं आहे. आई ज्या रुममध्ये बाळाला स्तनपान करते ती रुम हवेशीर असली पाहिजे. बेडशीट देखील रोज बदलली गेली पाहिजे. स्वच्छतेची काळजी न घेतल्यास बाळ आणि आईच्या प्रकृतीवर परिणाम होण्याची भीती असते. 

4. योग्य कपडे घ्याला

गर्भधारणेनंतर महिलेच्या स्तनांमध्ये बदल जाणवतात. स्तनांचा आकार बदलतो. त्यामुळे अशावेळी तुम्ही योग्य कपडे घालणे महत्त्वाचे आहे. या दिवसांमध्ये नवीन आईने कॉटन फीडींग ब्रा घातले पाहिजे. फीडींग ब्रामुळे आईला बाळाला दूध देणे सोपे होते. या दिवसांमध्ये आईने हलके आणि त्वचेला श्वास घेता येईल असं कपडे घालावे. 

5. केसांना बांधून ठेवा 

बाळाला स्तनपान करताना आईने कायम केस बांधून ठेवले पाहिजे. जर आईने केस बांधले नाही तर ते बाळाच्या पोटात जाऊ शकतात. त्यामुळे लांब केस असल्यांनी या गोष्टीची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. 

6. ब्रेस्ट पॅड वापरा

स्तनपान करणाऱ्या महिलांनी ब्रेस्ट पॅडचा वापर करावा. या पॅडमुळे स्तनातून गळणारे दूध शोषले जाते. तसंच ते त्वचेवर जमा होत नाही. त्वचेवर दूध साचल्यामुळे बॅक्टेरियाचा धोका निर्माण होतो. 

7. ब्रेस्ट पंप स्वच्छ ठेवा

गेल्या काही वर्षांपासून आई आणि बाळाच्या सोयीसाठी अनेक वस्तू मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. तील एक गोष्ट आहे ती ब्रेस्ट पंप. हा पंप कामावर जाणाऱ्या आईंसाठी खूप सोयीस्कर आहे. या पंपद्वारे आई आपल्या बाळासाठी स्तनातील दूध काढून ठेवू शकते. मात्र हे करताना या ब्रेस्ट पंपची स्वच्छतेची काळजी घेणे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. हे ब्रेस्ट पंप साफ ठेवण्यासाठी वेगळा स्पंज ठेवला पाहिजे. ब्रेस्ट पंपला स्वच्छ ठेवण्यासाठी बाजारात अनेक गोष्टी उपलब्ध आहेत.  

Related posts