Husband Kills His Wife After 17 Days Of Their Marriage; लग्नानंतर १७ दिवसांनी पतीने पत्नीला संपवलं

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

भोपाळ: मध्य प्रदेशच्या इंदूर जिल्ह्यात नवविवाहित पतीनं पत्नीची चाकूनं भोसकून निर्घृणपणे हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. इंदूरच्या धार नाका परिसरात राहणाऱ्या विक्रमचा विवाह २१ मे २०२३ रोजी अंजलीशी झाला. ज्या हातांवर विक्रमच्या नावाची मेहंदी रंगली, तेच हात अंजलीच्या रक्तांनी माखले. अंजलीची हत्या करताना आरोपीदेखील जखमी झाला. त्याच्या हाताला इजा झाली. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.इंदूरच्या धार नाका परिसरात राहणाऱ्या विक्रमनं पत्नी अंजलीची चाकूनं भोसकून हत्या केली. त्यानं अंजलीच्या शरीरात दहावेळा चाकू भोसकला. गळ्यासोबत अनेक अवयवांवर चाकूनं वार केले. अंजलीचा आरडाओरडा ऐकून विक्रमच्या कुटुंबियांनी त्यांच्या खोलीच्या दिशेनं धाव घेतली. तेव्हा त्यांना अंजली फरशीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. शेजारीच विक्रम जखमी अवस्थेत होता.
करवतीने २० तुकडे केले, प्रेशर कूकरमध्ये शिजवले; लिव्ह इन पार्टनरला निर्घृणपणे संपवलं
दोघांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी अंजलीला मृत घोषित केलं. घटनेची माहिती मिळताच पोलीस पोहोचले. त्यांनी कुटुंबियांची चौकशी करुन माहिती घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. विक्रमला उपचारांसाठी इंदूरच्या रुग्णालयात हलवण्यात आलं.

२१ मे रोजी विक्रम आणि अंजलीचा विवाह मोठ्या धुमधडाक्यात झाला होता. विक्रम पिथमूपरमधील कारखान्यात कामाला आहे. विक्रम अंजलीसोबत विवाह करण्यास तयार नव्हता. त्याच्या मर्जीविरोधात लग्न झाल्यानं तो नाराज होता, अशी माहिती तपासातून उघडकीस आली आहे.
पूलमध्ये पोहताना श्वसननलिकेला इजा, तरुण व्हेटिंलेटरवर; एका सवयीनं घात; अशी चूक करू नका!
पतीनं त्याच्या नवविवाहित पत्नीची हत्या करुन स्वत:लादेखील चाकूचे वार करुन जखमी केल्याची घटना घडली आहे. आरोपी पतीवर उपचार सुरू आहेत. मृतदेहाचं शवविच्छेदन पू्र्ण झालं असून पुढील कारवाई सुरू आहे, अशी माहिती ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक हितिका वासल यांनी दिली.

[ad_2]

Related posts