Lok Sabha Election Election Commission Of India ECI Clafication On Election Date 16 April Viral Letter Marathi News 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली: लोकसभेच्या निवडणुकीची तारीख ही 16 एप्रिल ठरल्याचं निवडणूक आयोगाचं (Election Commission Of India)  एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावर आता केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलं आहे. निवडणुकीच्या कामासाठी (Lok Sabha Election) फक्त संदर्भ म्हणून ही तारीख नोंद केल्याचं निवडणूक आयोगाने सांगितलं. त्यामुळे 16 एप्रिल रोजी निवडणूक होणार या बातम्यांना आता ब्रेक लागला आहे. 

निवडणूक आयोगाच्या सीईओच्या कार्यालयातून एक पत्र सोशल मीडियावर समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यामध्ये निवडणूक आयोगाने 16 एप्रिल ही निवडणुकीची तारीख म्हणून धरल्याचं सांगण्यात येतंय. ही बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाल्यानंतर आता निवडणूक आयोगाला त्यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे.

निवडणूक आराखड्याचे नियोजन करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या संदर्भासाठी ही तारीख वापरल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलंय. त्या माध्यमातून 16 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं. 

 

व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये काय लिहिलंय?

निवडणूक आयोगाने तात्पुरता मतदानाचा दिवस 16 एप्रिल 2024 घोषित केला आहे. अधिसूचना दिल्लीच्या सर्व 11 जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना जारी करण्यात आली होती. त्यावर ‘भारतीय निवडणूक आयोगाच्या निवडणूक आराखड्यात दिलेल्या वेळेचे पालनपालन’ असे शीर्षक आहे. दिल्ली सीईओच्या कार्यालयाने थोड्याच वेळात ट्विटरवर पोस्ट केले आणि ती तारीख केवळ संदर्भासाठी होती. 

महाराष्ट्रात मविआमध्ये जागावाटपाचा तिढा

इंडिया आघाडीच्या राज्यातील लोकसभा जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. या जागा वाटपामध्ये निर्णय होण्याआधीच शिवसेना ठाकरे गटाने राज्यातील 48 पैकी 23 जागांवर लढण्याचा प्रस्ताव समोर ठेवला आहे. या जागा लढण्यावर शिवसेना ठाकरे गट ठाम आहे. तर हाच ठाकरे गटाचा प्रस्ताव राज्यातील काँग्रेस नेत्यांनी एक प्रकारे धुडकावून लावला आहे. तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीने समसमान चार पक्षांनी 12-12 जागा लढवाव्यात असा फॉर्म्युला समोर ठेवला आहे. त्यामुळे तिढा सुटण्याऐवजी हा तिढा रोज नेत्यांकडून येणाऱ्या राजकीय प्रतिक्रियांमुळे आणि दाव्यामुळे वाढत असल्याचे दिसतंय. 

ही बातमी वाचा: 



[ad_2]

Related posts