( प्रगत भारत । pragatbharat.com)
CM Eknath Shinde: महाराष्ट्रचे वैभव ओरबाडू देणार नाही, मिंधे शेपूट घालून खुर्चीसाठी चाकरी करतोय, अशा भाषेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टिका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना जशास तसे उत्तर दिले आहे. ‘लबाड लांडगं ढॅाग करतंय…!वाघाचं कातडं ओढून सॅांग करतंय..! वाघ एकला राजा…!बाकी खेळ माकडांचा…’ या गाण्यांच्या ओळीत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला आहे.
भगवी वस्त्र आणि रुद्राक्षांच्या माळा घातलेल्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार अंमलात आणण्यासाठी वाघाचं काळीज लागतं.
लबाड लांडगा वाघाचं काताडं पांघरून वाघ होण्याचं सोंग करतो. पण वाघ होण्यासाठी वाघाचं काळीज लागतं. आमचा वाघ एकच ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे…!असे ते म्हणाले.
भगवे वस्त्र आणी रुद्राक्ष माळा घालून कोणालाही बाळासाहेब होता येणार नाही. त्यासाठी बाळासाहेबांसारखे धगधगते विचार असावे लागतात, असे मुख्यमंत्री म्हणाले. कॉंग्रेसच्या ताटाखालीचे मांजर होऊन, सत्तेसाठी सर्वात मोठा कोणी मिंदे पण केला..? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ये पब्लिक है सब जानती है ..!! असे ते म्हणाले.
तेव्हा शिवसैनिकांनी हिंदूंना वाचवलं?
महाराष्ट्र्र संकटात असताना मोदीजी कुठे होते? आता फक्त मतांसाठी येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रजांची वखार म्हणून सुरत लुटली होती. मोदीजी महाराष्ट्र लुटत आहात. महाराष्ट्र ओरबाडत आहात, अशी टिका उद्धव ठाकरेंनी केली. महाराष्ट्राच्या हक्काचं वैभव आम्ही तुम्हाला ओरबडू देणार नाही. मोदीजी आता महाराष्ट्र फिरून घ्या, हाच महाराष्ट्र तुम्हाला धडा शिकवणार आहे. देश के लिए ‘मन की बात’ आणि गुजरात के लिए ‘धन की बात’! ज्यावेळी दंगली उसळल्या तेव्हा शिवसैनिकांनी हिंदूंना वाचवलं, जा कुणालाही विचारा. पंतप्रधान मोदी देश आणि गुजरातमध्ये एक भिंत उभी करत आहात. हे हिंदुत्व नाही असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला. महाराष्ट्राने तुमचं काय पाप केलंय? संकटात ज्या महाराष्ट्राने तुम्हाला वाचवलं, त्या महाराष्ट्राच्या मुळावर का घाव घालताय? असे सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केले.
दिशा दाखवली त्यांना तुम्ही संपवायला निघाले
मत मागायला तुम्हाला हनुमानाची, रामाची गरज लागते तर मग तुम्ही दहा वर्षात केलं काय असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. मत मागायला तुम्हाला हनुमानाची, रामाची गरज लागते तर मग तुम्ही दहा वर्षात केलं काय? ज्यांनी तुम्हाला दिशा दाखवली, त्यांना तुम्ही संपवायला निघालायत अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.