Mamata Banerjee CM Of West bengal Injured In Car Accident On Way To Kolkata From Burdwan District

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Mamata Banerjee Car Accident :  पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या (TMC) प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या कारचा अपघात झाला आहे. या कार अपघातात ममता बॅनर्जी जखमी झाल्या आहेत. ममता यांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आहे. 

सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ममता बॅनर्जी राज्याच्या पूर्व आणि पश्चिम बर्दवान जिल्ह्यात पोहोचल्या होत्या. पावसामुळे ममता बॅनर्जी रस्त्याने कोलकाता येथे परतत असल्याची माहिती समोर आली आहे. कमी दृश्यमानता आणि रस्त्यावरील धुके यामुळे हा अपघात झाला. गाडीने ब्रेक लावल्याने मुख्यमंत्र्यांच्या डोक्याला दुखापत झाली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची कार दुसऱ्या वाहनाला धडकू नये म्हणून अचानक थांबवण्यात आली. त्यावेळी हा अपघात झाला. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, वर्धमानहून कोलकाता येथे परतत असताना हा अपघात झाला. बॅनर्जी यांच्या ताफ्यासमोर दुसरी कार आली आणि त्यामुळे त्यांच्या गाडीने लगेच ब्रेक लावला.यात अपघात झाला. हवामान खराब असल्याने ममता बॅनर्जी या हेलिकॉप्टरऐवजी कारने प्रवास करत आहेत. 

काँग्रेसने काय म्हटले?

काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी ममता बॅनर्जी यांच्या कार अपघाताबाबत  दु:ख व्यक्त केले आहे. ममता बॅनर्जी या अपघातातून लवकरच बऱ्या होतील अशी प्रार्थना आम्ही करत असल्याचे त्यांनी म्हटले. भारत जोडो न्याय यात्रा ही गुरुवारी (25 जानेवारी) सकाळी पश्चिम बंगालमध्ये प्रवेश करणार आहे. 

 

यापूर्वीही ममता बॅनर्जी यांचा अपघात 

गेल्या वर्षी जूनमध्ये ममता बॅनर्जी या अपघातामुळे जखमी झाल्या होत्या.पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी जलपायगुडीतील निवडणूक रॅलीनंतर बागडोगरा विमानतळावर जात होत्या.यावेळी त्यांचे हेलिकॉप्टर खराब हवामानाच्या परिसरात बैकुंठपूरच्या जंगलाजवळ पोहोचले.

यानंतर हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आणि यादरम्यान ममता बॅनर्जी यांच्या डाव्या गुडघ्याच्या लिगामेंटला दुखापत झाली.

 

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts