[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
National Tourism Day 2024 : आज राष्ट्रीय पर्यटन दिन (National Tourism Day). भारतात पर्यटनाचे महत्त्व आणि भारतीय अर्थव्यवस्थेत त्याची भूमिका याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी, तसेच लोकांना शिक्षित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. दिनानिमित्त आज आपण पर्यटनाचे महत्त्व, उद्देश आणि इतिहास यांविषयी जाणून घ्या.
खरंतर, हा दिवस आपल्या प्रत्येकासाठी खूप गरजेचा आहे. कारण आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण इतके व्यस्त झालो आहोत की यामध्ये स्वत:साठी वेळ देणे, कुठेतरी फिरायला जाणं, निवांत बसणं, निसर्गाचं सौंदर्य पाहणं हे आपण विसरत चाललो आहोत. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपल्या मौल्यवान वेळेत थोडा वेळ शोधून काढला पाहिजे जेणेकरून तो आपल्या कुटुंबासह, मित्रांसह, नातेवाईकांसह आपल्या देशात किंवा इतर कोणत्याही ठिकाणी प्रवास करू शकेल.
राष्ट्रीय पर्यटन दिवस 2024 चा इतिहास
जगातील बहुतेक देशांमध्ये 27 सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन साजरा केला जातो. पण भारतात 25 जानेवारीला हा दिन साजरा करतात. भारतामध्ये पर्यटन दिन साजरा करण्याची सुरुवात स्वातंत्र्यानंतरच्या पुढच्या वर्षी म्हणजेच 1948 मध्ये सुरू झाली. त्यासाठी वाहतूक समिती स्थापन करण्यात आली. समितीच्या स्थापनेनंतर 3 वर्षांनी म्हणजेच 1951 मध्ये कोलकाता आणि चेन्नईमध्ये पर्यटन दिनाची प्रादेशिक कार्यालये सुरू झाली. यानंतर दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथेही पर्यटन कार्यालये निर्माण करण्यात आली आणि 1998 मध्ये पर्यटन आणि दळणवळण मंत्री यांच्या नेतृत्वाखाली पर्यटन विभागाची स्थापना करण्यात आली.
पर्यटन दिनाचे महत्त्व
भारत हा असा देश आहे जिथे 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. अनेक सुंदर ठिकाणे पाहण्याची आणि संस्कृती, विविध भाषा, बोली आणि संस्कृती आणि परंपरा जाणून घेण्याची संधी या ठिकाणी निर्माण होते. धार्मिक स्थळे आणि ऐतिहासिक महत्त्वाच्या ठिकाणांबरोबरच तुम्हाला सुंदर पर्वतरांगा, वाळवंट, बर्फाच्छादित ठिकाणं, समुद्रकिनारे, जंगल यांची विविधता पाहण्याची संधी मिळते. या दिनाचं महत्त्व समजून घेऊन प्रत्येकाने पर्यटन नक्की करावं.
पर्यटन दिनाचे उद्दिष्ट
राष्ट्रीय पर्यटन दिनाचा मुख्य उद्देश भारतीय पर्यटन स्थळांना प्रोत्साहन देणे आणि त्यांना जागतिक स्तरावर आणणे हा आहे. पर्यटन हा प्रमुख उद्योग असल्याने भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असल्याचे म्हटले जाते. या कामात राष्ट्रीय पर्यटन दिन महत्त्वाची भूमिका बजावतो. या दिवसाच्या माध्यमातून लोकांना जागतिक स्तरावर पर्यटनाचे सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक मूल्य किती आहे, याची जाणीव करून देणं गरजेचं आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
National Voters Day 2024 : आज साजरा केला जातोय ‘राष्ट्रीय मतदार दिन’; जाणून घ्या या दिनाचं महत्त्व
अधिक पाहा..
[ad_2]