Tata Group and Airbus signed deal to manufacture single engine helicopters 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Tata-Airbus Deal: टाटा समूहाने (Tata Group) विमान निर्मिती कंपनी एअरबससोबत (Airbus) करार केला आहे. हा करार देशात सिंगल इंजिन हेलिकॉप्टर आणि इतर विमानांच्या निर्मितीसाठी करण्यात आला आहे. भारतातील उत्पादनाला चालना मिळणार असून, आत्मनिर्भर भारताच्या दिशेने टाकलेले हे एक मोठे पाऊल आहे.

दरम्यान, टाटा समूह आणि एअरबसया यांच्यात झालेल्या करारांतर्गत, गुजरातमधील वडोदरा येथे अंतिम असेंब्ली लाइन तयार केली जाणार आहे. तिथे टाटा समूह आणि एअरबस संयुक्तपणे एअरबसचे H125 सिंगल इंजिन हेलिकॉप्टर तयार करतील. ही असेंबली लाईन 36 एकरांवर बांधली जाणार आहे. 2024 च्या मध्यापर्यंत याचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळं नोव्हेंबर 2024 पासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हैदराबादमधील एअरबसचा मुख्य घटक असेंब्ली लाईनवर विमानाचे भाग तयार केले जातील. तेथून भाग वडोदराला पाठवले जातील आणि वडोदराच्या असेंब्ली लाईनमधील पार्ट्समधून विमान बनवले जाईल. करारानुसार, वडोदरा-आधारित असेंब्ली लाइनमध्ये किमान 40 C295 वाहतूक विमाने देखील तयार केली जातील.

प्रजासत्ताक दिनादिवषी केली घोषणा

प्रजासत्ताक दिनानिमित्त परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी या कराराची घोषणा केली आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन सध्या भारत दौऱ्यावर आहेत. दरम्यान, भारत आणि फ्रान्स यांच्यात संरक्षण आणि औद्योगिक रोडमॅप आणि संरक्षण-अंतराळ भागीदारी यावर एक करार झाला आहे. टाटा आणि एअरबस यांच्यात हा करार परस्पर संमतीने झाला आहे. दरम्यान, ही भारतातील खासगी क्षेत्रातील पहिली हेलिकॉप्टर असेंब्ली सुविधा असणार आहे. टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांनी याबद्दल  माहिती दिली. या सुविधेमध्ये जगातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या एअरबस H125 सिंगल इंजिन हेलिकॉप्टरची अंतिम असेंब्ली लाइन असणार आहे. एअरबसच्या सहकार्याने या सुविधेमध्ये निर्मित H125 सिंगल इंजिन हेलिकॉप्टर भारतात वापरले जातील आणि त्यांची निर्यातही केली जाईल.

देशात सध्या अशा 800 हेलिकॉप्टरची तात्काळ मागणी 

सध्या भारतात अशा 800 हेलिकॉप्टरची तात्काळ मागणी आहे. ही मागणी उच्च नेटवर्थ व्यक्तींसह विविध क्षेत्रांकडून आहे. टाटा आणि एअरबस यांच्यातील करारामुळं ही मागणी पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

पायलटची तक्रार टाटांना पडली महागात, एअर इंडियाला भरावा लागणार 1.10 कोटींचा दंड

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts