Tata Airbus ink deal to make H125 single-engine choppers in India Tata-Airbus Deal update marathi ness

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Tata-Airbus Deal Update : टाटा समूह (TATA Company) आणखी एका उद्योगात (Industry) पाय रोवण्यासाठी तयार आहे. टाटा समूहाने (TATA Group) विमान आणि हेलिकॉप्टर (Helicopter) निर्मिती कंपनी एअरबस (Airbus) सोबत करार केला आहे. ‘मेक इन इंडियाला’ (Made in India) चालना देण्यासाठी आता एअरबस कंपनी आता टाटा समूह यांच्यात करार पार पडला आहे. फ्रान्सची जेट निर्माती कंपनी एअरबस टाटा समूहासोबत देशातील हेलिकॉप्टरसाठी अंतिम असेंब्ली लाइन सेट करण्यासाठी भागीदारी करत असल्याचं एअरबस हेलिकॉप्टर्सने जाहीर केलं आहे. हा करार देशात सिंगल इंजिन हेलिकॉप्टर आणि इतर विमानांच्या निर्मितीसाठी आहे. भारतातील उत्पादनाला चालना देण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल मानलं जात आहे.

टाटा आणि एअरबस कंपनीचा करार

टाटा कंपनी आता एअरबस कंपनीसोबत मिळून हेलिकॉप्टर्स निर्मिती करणार आहे. FAL भारतासाठी त्यांच्या नागरी श्रेणीतून एअरबसचे सर्वाधिक विकले जाणारे H125 हेलिकॉप्टर तयार करेल. त्यामुळे आता एअरबस हेलिकॉप्टर्स मेड इन इंडिया असतील. इतकंच नाही तर टाटा हे हेलिकॉप्टर्स शेजारील देशांमध्ये निर्यातदेखील करेल.

आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक मोठं पाऊल

भारत सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमाचा भाग होत देशाच्या विकासाला हातभार लावणारं हे ऐतिहासिक पाऊल आहे. भारतात हेलिकॉप्टर निर्मिती सुविधा उभारण्यात खासगी क्षेत्राने पुढाकार घेतल्याचं हे पहिलं उदाहरण आहे. टाटा समूह आणि एअरबस यांच्यातील या करारामुळे देशातील उत्पादनाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. आत्मनिर्भर भारताच्या दिशेने हे एक मोठं पाऊल आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी या कराराची घोषणा केली आहे. 

एअरबसच्या H125 सिंगल-इंजिन हेलिकॉप्टरची निर्मिती

एअरबस आणि टाटा समूहाने संयुक्तपणे युरोपियन विमान निर्माती कंपनी एअरबसच्या H125 सिंगल-इंजिन हेलिकॉप्टरची निर्मिती करण्यासाठी करार केला आहे. गुजरातच्या वडोदरा येथे व्यावसायिक वापरासाठी फायनल असेंब्ली लाइन (FAL) सेट करण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली आहे. या करारांतर्गत, गुजरातमधील वडोदरा येथे अंतिम असेंब्ली लाइन तयार केली जाईल, जिथे टाटा समूह आणि एअरबस संयुक्तपणे एअरबसचे H125 सिंगल इंजिन हेलिकॉप्टर तयार करतील. 

या वर्षीपासून ही सुविधा सुरू होणार

36 एकरांवर पसरलेला FAL (Final Assembly Line) 2024 च्या मध्यापर्यंत तयार होईल आणि नोव्हेंबर 2024 पर्यंत काम सुरू होईल. FAL हैदराबादमध्ये एअरबसच्या मेन कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली (MCA) लाईनवर उत्पादित केलेले भाग वापरेल आणि अंतिम असेंब्लीसाठी वडोदरा येथे पाठवले जातील. या कराराअंतर्गत 40 C-295 वाहतूक विमानेही तयार करण्यात येतील, याची देखरेख TASL (Tata Advanced Systems Ltd.) करेल.

वडोदरामध्ये असेंबलिंग

हैदराबादमधील एअरबसच्या मुख्य घटक असेंब्ली लाईनवर विमानाचे भाग तयार केले जातील. 36 एकरांवर असेंबली लाईन बांधली जाणार आहे. 2024 वर्षाच्या मध्यापर्यंत असेंबली लाईन तयार होईल आणि नोव्हेंबर 2024 पासून तेथे कामाला सुरुवात होईल. तेथून हेलिकॉप्टरचे भाग तयार करून वडोदराला पाठवले जातील. वडोदराच्या असेंब्ली लाईनमधील पार्ट्स जोडून हेलिकॉप्टर बनवलं जाईल. करारानुसार, वडोदरा-आधारित असेंब्ली लाइनमध्ये किमान 40 C295 वाहतूक विमाने देखील तयार केली जातील.

हेलिकॉप्टरची निर्यातही केली जाणार

ही भारतातील खाजगी क्षेत्रातील पहिली हेलिकॉप्टर असेंब्ली सुविधा असेल. टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांनी याबद्दल सांगितलं की, या सुविधेमध्ये जगातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या एअरबस H125 सिंगल इंजिन हेलिकॉप्टरची अंतिम असेंब्ली लाइन असेल. एअरबसच्या सहकार्याने या सुविधेमध्ये निर्मित H125 सिंगल इंजिन हेलिकॉप्टर भारतात वापरले जातील आणि त्यांची निर्यातही केली जाईल.

भारतात मोठी मागणी

मनीकंट्रोलच्या अहवालानुसार, सध्या भारतात अशा 800 हेलिकॉप्टरची तात्काळ मागणी आहे. ही मागणी मोठी मालमत्ता असलेल्या विविध क्षेत्रांतील व्यक्तींकडून या हेलिकॉप्टर्सला मोठी मागणी आहे. टाटा आणि एअरबस यांच्यातील करारामुळे ही मागणी पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts