Citizens will get 300 units of free electricity under Pradhan Mantri Suryoday Yojana marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Budget 2024 : प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा (Pradhan Mantri Suryoday Yojana) लाभ देशातील गरीब आणि मध्यमवर्गीयांना मिळणार आहे. यामुळं लोकांना वीज बिलात मोठा दिलासा मिळणार आहे. आता सर्वसामान्यांना 300 युनिट वीज मोफत मिळणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अंतरीम अर्थसंकल्प मांडला. यामध्ये विविध योजनांची घोषणा त्यांनी केली आहे. 

प्रधानमंत्री सूर्योदय योजनेंतर्गत एक कोटी घरांवर रुफटॉप सोलर पॅनेल बसवण्यात येणार 

 प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा अर्थसंकल्प 2024 मध्ये उल्लेख करण्यात आला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, या योजनेंतर्गत ज्यांच्या घरात सौर यंत्रणा बसवली आहे त्यांना 300 युनिटपर्यंत मोफत वीज दिली जाईल. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनानंतर या योजनेची घोषणा केली होती. तसेच अधिकाऱ्यांची बैठकही घेतली होती. प्रधानमंत्री सूर्योदय योजनेंतर्गत देशभरातील एक कोटी घरांवर रुफटॉप सोलर पॅनेल बसवण्यात येणार आहेत.

 गरीब आणि मध्यमवर्गीयांना प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा फायदा होणार 

देशातील गरीब आणि मध्यमवर्गीयांना प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा फायदा होणार आहे. या योजनेबाबत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी ट्वीटरवर पोस्ट केली होती. ज्यामध्ये त्यांनी सांगितले की, या योजनेमुळं भारत ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर होईल. अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाच्या शुभमुहूर्तावर, भारतातील लोकांच्या घराच्या छतावर स्वतःची सोलर रूफ टॉप यंत्रणा असावी हा माझा संकल्प आणखी दृढ झाल्याचे पंतप्रधान म्हणाले होते. आमचे सरकार 1 कोटी घरांवर रुफटॉप सोलर बसवण्याचे उद्दिष्ट घेऊन “प्रधानमंत्री सूर्योदय योजना” सुरू करणार आहे. यामुळं गरीब आणि मध्यमवर्गीयांचे वीज बिल कमी होणार नाही, तर भारताला स्वयंभू बनवेल असे पंतप्रधान म्हणाले. 

विविध योजनांची घोषणा

प्रत्येकाला कायमस्वरूपी घरे दिली जातील. स्किल इंडियामध्ये 1.47 कोटी तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेचा विस्तार केला जाईल. मत्स्य उत्पादनात दुपटीने वाढ झाली आहे. पीएम मोदींनी ‘जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान’चा नारा दिला आहे. हे लक्षात घेऊन पावले उचलली जातील. गेल्या 4 वर्षात आर्थिक विकासाला वेग आला आहे. युवाशक्ती तंत्रज्ञानयुक्त योजना बनवेल. तसेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, की लखपती दीदींना बढती दिली जाईल.  या योजनेमुळे 9 कोटी महिलांच्या आयुष्यात बदल झाला आहे. लखपती दीदींकडून स्वावलंबन आले आहे. अंगणवाडी कार्यक्रमांना गती दिली जाईल. आतापर्यंत एक कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्यात आले आहे. तसेच गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी प्रयत्न केले जातील. यासाठी लसीकरण करणार आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील. मिशन इंद्रधनुषमध्ये लसीकरण वाढवण्यात येणार आहे. नवीन वैद्यकीय महाविद्यालये उघडली जातील असे सीतारामन म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या:

Budget 2024: सर्वाइकल कॅन्सरपासून बचावासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 9 ते 14 वर्षांच्या मुलींना मोफत लस

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts