ins sandhayak will joined indian navy today commissioning ceremony rajnath singh Indian Navy’s latest survey vessel to join naval force What is INS Sandhayak marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

INS Sandhayak in Indian Navy : भारताची सागरी ताकद आणखी वाढली आहे. भारतीय नौदलात आणखी एक योद्धा सामील झाला आहे. आयएनएस संधायक युद्धनौका भारतीय नौदला सामील झाली आहे. आयएनएस संधायक हे सर्वेक्षण जहाज आहे, ज्याच्यामुळे भारतीय नौसेनेचा समुद्रातील प्रवास सोपा आणि सुखकर होणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या कार्यालयाने एक्स मीडियावर अधिकृत अकाऊंटवरून पोस्ट करत याबाबत मोठी माहिती दिली आहे. 

आयएनएस संधायक नौदलाचा ‘गुगल मॅप’

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज आयएनएस संधायक नौदलात सामील करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशातील विशाखापट्ट्णम येथे हा कार्यक्रम पार पडला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह विशाखापट्टणम येथील नेव्हल डॉकयार्ड येथे आयएनएस संधायकच्या कमिशनिंग सोहळ्याला उपस्थित होते. यासोबतच भारतीय नौदल प्रमुख ॲडमिरल आर हरी कुमार देखील उपस्थित होते.

भारतीय नौदल प्रमुख ॲडमिरल आर हरी कुमार यांनी विशाखापट्टणम येथील नौदल डॉकयार्ड येथे आयएनएस संधायकच्या कमिशनिंग समारंभाला संबोधित केले. यादरम्यान, ते म्हणाले की, ”नौदल उगवत्या भारताच्या सेवेत संतुलित ‘आत्मनिर्भर शक्ती’ तयार करण्यासाठी समर्पित आहे. उगवत्या भारताच्या सेवेसाठी आम्ही काळजीपूर्वक संतुलित ‘आत्मनिर्भर शक्ती’ तयार करत आहोत.” संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आयएनएस संधायकच्या कमिशनिंग सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी विशाखापट्टणमला पोहोचले होते, यावेळी नौदल प्रमुखांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं.

समुद्रात गुगल मॅप म्हणून काम करणार INS संधायक

नौदल प्रमुखांनी पुढे सांगितलं की, “समुद्रात नकाशा किंवा चार्ट किती महत्त्वाचा असतो, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. समुद्रामध्ये गुगल मॅप्स किंवा सिरीसारखे कोणतेही मोबाइल ॲप्लिकेशन नाही, ज्यामुळे आपल्याला आपल्या समुद्रातील गंतव्यस्थानापर्यंत घेऊन जाण्यात मदत होईल. त्यामुळे सर्वेक्षणाद्वारे तयार केलेल्या चार्ट आणि नकाशांवर अवलंबून राहावं लागतं. आयएनएस संधायक सारखी जहाजे हे सर्वेक्षण जहाज यामुळे भारतीय नौदलासाठी महत्त्वाचं आहे.”

हरी कुमार म्हणाले की, “फक्त नौदलाच्या जहाजांनाच नव्हे तर, व्यावसायिक जहाजांनाही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेव्हिगेट करणे शक्य आणि सोपे करणाऱ्या नकाशांची गरज आहे. या जहाजांची प्राथमिक भूमिका बंदरे आणि बंदरांचे पूर्ण-प्रमाणावर किनारपट्टी आणि खोल पाण्याचे जलविज्ञान सर्वेक्षण करणे असेल. याव्यतिरिक्त, जहाजे आकस्मिक परिस्थितीत हॉस्पिटल जहाजे म्हणून देखील वापरली जाऊ शकतात.”

 

 

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts