पतीचा गळा घोटला, रात्रभर पत्नी त्याच्याच मृतदेहाशेजारी बसून राहिली; अन् सकाळी…

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Crime News In Marathi: राजस्थानमधील चूरूमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेने लव्ह मॅरेजच्या 4 वर्षांनंतर तिच्या पतीची हत्या केली आहे. दोरखंडाच्या सहाय्याने तिने पतीचा गळा घोटला त्यानंतर रात्रभर ती पतीच्या बाजूला बसून त्याचा चेहऱ्याकडे पाहत बसली होती. त्यानंतर तिने पतीने आत्महत्या केल्याचा बनाव रचला. मात्र, तिचा कट पोलिसांनी उघड पाडला. पतीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करुन कुटुंबीयांना सोपवण्यात आला आहे. तर, पत्नीला हत्येच्या प्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चूरू शहरातील ओम कॉलनी परिसरात ही घटना घडली आहे. हे दाम्पत्य भाड्याच्या घरात राहत होते. आरोपी पत्नी दीपिकाने तिचा पती मोहनलालची दोरखंडाने गळा आवळून हत्या केली. त्यानंतर पूर्ण रात्र त्याच्या मृतदेहाशेजारी बसून काढली. सकाळी आरोपी महिलेने पोलिसांना फोन करुन पतीने आत्महत्या केल्याचे सांगितले. पोलिस जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा तेथील परिस्थिती पाहून त्यांना संशय आला. 

पोलिसांनी मृतदेहाची तपासणी केल्यानंतर त्यांना शंका आली. त्यांनी पत्नीची खोलात जाऊन चौकशी केली. त्यानंतर पत्नीचे बिंग फुटले आणि तिनेच पतीची हत्या केल्याचे समोर आले आहे. त्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर, शेजाऱ्यांनाही धक्का बसला आहे. 

या प्रकरणात पोलिस ठाण्याचे अधिकारी करतार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, बर गावाचे रहिवासी दलबीर यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दलबीर हे मृतक मोहनलालचे वडिल आहे. दलबीर यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटलं आहे की, 2019 मध्ये त्यांचा मुलगा मोहनलालने दीपिकासोबत लव्ह मॅरेज केले होते. सुरुवातीला ते दोघे गावातच राहत होते. 

त्यानंतर गेल्या 8 महिन्यांपासून मोहनलाल आणि दीपिका चुरूयेथील ओम कॉलनीमध्ये भाड्याच्या घरात राहायला लागले. दोघांमध्ये सतत वाद होत होते. दीपिकाला मोहनलालसोबत राहायचे नव्हते. तिने कित्येतवेळा त्याच्यापासून वेगळं होण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात तिला यश आलं नाही. घटस्फोट दिला नाही तर मी कोणत्याही थराला जाऊ शकते, असा इशाराही तिने वारंवार दिला होता. मोहनलालची तिनेच हत्या केली आहे. रात्री दोरीच्या सहाय्याने तिने त्याचा गळा घोटला आणि आम्हाला फोन करुन त्याचा मत्यू झाल्याची माहिती दिली. 

Related posts