Saraswati Puja 2024 : वसंत पंचमीला सरस्वतीसमोर करा अक्षर पूजा! वाणी दोष, शिक्षणाचे अडथळेही होतील दूर

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Saraswati Puja 2024 or Basant Panchami 2024 : माघ शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला वसंत पंचमी (Vasant Panchami) ला माता सरस्वतीची पूजा करण्यात येते. वसंत पंचमी ही व्हॅलेंटाईन डे (Valentine Day) म्हणजेच 14 फेब्रुवारीला आहे. यादिवशी सर्व घरांमध्ये आणि शाळांमध्ये देवी सरस्वतीची पूजा करण्यात येते. हा दिवस विद्यार्थ्यांसाठी खूप खास आहे कारण हा दिवस त्यांच्या शिक्षणाची सुरुवात करण्यासाठी आणि अभ्यासात यश मिळवण्यासाठी शुभ मानला जातो. (Perform Akshar Puja in front of Saraswati on Vasant Panchami Speech defects barriers to education will also be removed Basant Panchami 2024)

या दिवशी देवी सरस्वतीच्या पूजेबरोबर उपवासही करणे शुभ मानले जाते. सरस्वती देवीची पूजा करताना पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करणे शुभ फळं मिळते. वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती देवीची पूजा केल्याने कला, संगीत आणि शिक्षण क्षेत्रात यश मिळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. असं म्हणतात की या दिवशी देवी सरस्वतीचे दर्शन होते, म्हणून हा दिवस तिचा जन्मदिवस म्हणूनही साजरा करण्यात येतो. शास्त्रानुसार, वसंत पंचमीच्या दिवशी मुलांनी आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या काही उपायांमुळे देवी सरस्वतीचा आशीर्वाद त्यांच्यासोबत आयुष्यभर राहतो आणि त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होतं. 

वसंत पंचमीला करा ‘हे’ उपाय!

ज्योतिषशास्त्र अभ्यासक श्वेता यांनी इन्स्टाग्रामवरील astroshweta369 या अकाऊंटवर वसंत पंचमीला काय उपाय करायचे याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. तिने सांगितलं की, शिक्षणातील अडथळे दूर करण्यासाठी आणि मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण होणार  ओम ऊँ सरस्वत्याय ऊँ नम: या मंत्राचा 108 वेळा जप करावा. 

मुलाच्या हाताने माता सरस्वतीला पिवळी फुलं, फळं, पिवळा भगवा तांदूळ अर्पण करावा. यामुळे माता सरस्वती प्रसन्न होते आणि तुमच्या मुलाच्या मानसिक विकासासाठी आशीर्वाद देते असं श्वेता सांगते. 
ज्या घरात लहान मुलं आहे आणि त्यांच्या अक्षर अभ्यासाला सुरुवात करायची असेल तर वसंत पंचमी हा अतिशय शुभ योग मानला जातो. यादिवशी चिमुकल्यांना अक्षर अभ्यास पूजा करुन त्यांच्या शिक्षणासाठी सरस्वतीचा आशिर्वाद मिळतो. 

ज्या मुलांमध्ये वाणी दोष म्हणजे मुलांना बोलण्यात अडचण येत असेल किंवा अभ्यास करुनही नीट लिहिता येत नाही. त्यांनी बसंत पंचमीच्या दिवशी चांदीचे पेन मधात बुडवून मुलाच्या जिभेवर ओम लिहावं. असं मानलं जातं की यामुळे बोलण्यात समस्या दूर होतात आणि मूल अभ्यासात प्रगती करतो. त्याशिवाय Switch Number for speech delay  524 हा मुलांच्या डाव्या हातावर रोज लिहा. त्यामुळे वाणीदोष दूर होतात. 

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

 

Related posts