morning headlines breaking national state news live headlines bulletin morning 14th February 2024 india maharashtra latest update marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील…

विठ्ठल रखुमाईचा आज शाही विवाह, द्वापार युगात रुक्मिणी मातेने संस्कृतमध्ये लिहले होते सावळ्या विठ्ठलाला प्रेमपत्र

 पंढरपूर:  पंढरपुरात (Pandharpur)   माघ शुद्ध पंचमी (Vasa अर्थात वसंत पंचमी दिवशी विठुरायाच्या मंदिरात पारंपारिक पद्धतीने आज विठुराया आणि रुक्मिणी मातेचा स्वर्गीय विवाह सोहळा शेकडो भक्तांच्या उपस्थिती मध्ये मोठ्या उत्साहात  संपन्न होणार आहे. सकाळपासूनच या आगळ्या वेगळ्या लग्नाची लगबग सुरु झाली आहे.  विठ्ठल मंदिराला विविध प्रकारच्या सुगंधी आणि रंगबिरंगी फुलांनी सजविण्यात आले आहे. आजच्या विवाहसोहळ्यासाठी साक्षात विठुराया आणि रुक्मिणीमातेसाठी  पांढरा शुभ्र पोशाख बनवण्यात आला आहे . यावर्षी विठुरायाच्या आंगीवर प्रभू श्रीराम आणि सीता यांचे आकर्षक चित्र दोरे कामात रेखाटण्यात आले आहे… वाचा सविस्तर 

National Film Award  Indira Gandhi Nargis Dutt :  इंदिरा गांधी आणि नर्गिस दत्त यांचे नाव राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार श्रेणीतून वगळले

National Film Award  Indira Gandhi Nargis Dutt :  देशात मानाचा समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या (National Film Award) श्रेणीत बदल करण्यात आले. त्यानुसार, आता चित्रपट पुरस्कार श्रेणीत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) आणि दिवंगत अभिनेत्री नर्गिस दत्त (Nargis Dutt) यांची नावे वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची एक अधिसूचना जारी करण्यात आली आहे… वाचा सविस्तर 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यूएईच्या दौऱ्यावर, भारत आणि UAE मध्ये डिटिजल पेमेंटसह आठ करार

PM Modi UAE Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE)  दौऱ्यावर आहेत. असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे बुधवारी अबुधाबी येथे आगमन झाले. संयुक्त अरब अमिरातीचे (UAE) अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांनी विमानतळावर त्यांचे  स्वागत केले. त्यानंतर भारत आणि यूएईमध्ये आठ सामंजस्य करार झाले. यूपीआय पेमेंट, वीज यासारख्या प्रमुख गोष्टींचा यामध्ये समावेश आहे. या करारामुळे आर्थिक विकासाला आणखी चालना मिळेल, असे मोदींनी सांगितलं… वाचा सविस्तर 

Long Life Secret: 100 वर्षांचं दीर्घायुष्य जगण्यासाठी ‘ही’ एकच गोष्ट आवश्यक; 93 वर्षांच्या वृद्धानं गुपित सांगितलं

Long Life Secret: सध्याचं युग तंत्रज्ञानाचं युग (Age of Technology) आहे, असं म्हटलं जातं. अन्न, वस्त्र, निवाऱ्याप्रमाणेच आता गॅजेट्स ही माणसाची अत्यंत महत्त्वाची मुलभूक गरज झाल्याचं गमतीनं बोललं जातं. त्यातच धकाधकीची जीवनशैली (Stressful Lifestyle), चुकीची आहारपद्धती (Wrong Diet) यांमुळे आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामनाही करावा लागतो. जगभर तंत्रज्ञानाचा प्रसार होत असल्यानं लोकांना निरोगी आणि दीर्घायुष्य जगणं कठीण होत चाललं आहे. दरम्यान, जगात असे अनेक लोकही आहेत, ज्यांचं वय 90 ते 100 वर्षांपेक्षा जास्त आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका व्यक्तीबद्दल सांगणार आहोत, ज्यांचं वय 93 वर्ष आहे आणि काही काळापासून चर्चेचा केंद्रबिंदू आहेत. त्याचं कारण म्हणजे, वयाच्या 93 व्या वर्षी रिचर्ड मॉर्गन (Richard Morgan) त्यांच्या अर्ध्या वयाच्या व्यक्तीएवढे फिट आहेत… वाचा सविस्तर 

14 February In History : पुलवामा हल्ल्यात 40 जवान शहीद; व्हॅलेंटाईन डे, जाणून घ्या आज इतिहासात काय घडलं

On This Day In History 14 February : 14 फेब्रुवारीचा दिवस जम्मू-काश्मीरमधील एका दुःखद घटनेने इतिहासात नोंदला गेला आहे. पाच वर्षे उलटून गेली पण त्या घटनेच्या जखमा अजूनही तशाच आहेत. जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफ जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवर स्फोटकांनी भरलेले वाहन घुसवून स्फोट घडवून आणला. त्यात 40 जवान शहीद झाले होते. या घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाले होते. या दिवसाची इतिहासात आणखी एका कारणाने नोंद आहे. 14 फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो.तिसर्‍या शतकात रोमच्या एका क्रूर सम्राटाने प्रेमीयुगुलांवर अत्याचार केले तेव्हा धर्मगुरू व्हॅलेंटाईनने सम्राटाची आज्ञा मोडून प्रेमाचा संदेश दिला म्हणून त्याला कैद करून 14 फेब्रुवारी रोजी फाशी देण्यात आली असे म्हणतात. प्रेमासाठी बलिदान देणाऱ्या या संताच्या स्मरणार्थ दरवर्षी 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याची प्रथा सुरू झाली… वाचा सविस्तर

Horoscope Today 14 February 2024: तूळ, वृश्चिक, धनु राशींसाठी आजचा बुधवार दिवस खास! करिअर, आर्थिक स्थिती कशी? जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Horoscope Today 14 February 2024 : राशीभविष्यानुसार, आज म्हणजेच 14 फेब्रुवारी 2024, बुधवार हा महत्त्वाचा दिवस आहे. आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? तूळ, वृश्चिक, धनु राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या… वाचा सविस्तर 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts