what is PM Vishwakarma Yojana Benefits government schemes hand Craftsman yojana beneficiaries documents detail marathi 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

PM Vishwakarma Yojana Benefits : जर तुमच्या शेजारी कुणी सुतार, लोहार, कुंभार किंवा इतर हस्त कारागिर आहेत का? त्यांच्यासाठी केंद्र सरकारची पीएम विश्वकर्मा योजना फायदेशीर ठरू शकेल. देशातील लहान प्रमाणात व्यवसाय करणाऱ्या हस्त कारागिरांना डोळ्यासमोर ठेऊन केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे. पीएम विश्वकर्मा योजना ‘पीएम विकास’ योजना म्हणूनही ओळखली जाते. 

देशातील हस्त कारागिरांचे कुशल कारागिरांमध्ये रुपांतर करण्यासाठी, त्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी आणि आर्थिकदृष्ट्या त्यांना सक्षम करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही योजना सुरू केल्याची घोषणा केली होती. 

पीएम विश्वकर्मा योजनेचा उद्देश भारतातील कारागिरांना सर्व प्रकारे मदत करणे हा आहे. यामध्ये हस्त कारागिरांना कौशल्य विकासापासून ते त्यांच्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम चालवणे, कार्यशाळा आयोजित करणे, त्यांची उत्पादकता आणि गुणवत्ता सुधारणे आणि आर्थिक मदत करणे इत्यादींचा समावेश आहे. सरकार कारागीर, विणकर, कुंभार, सुतार आणि लोहार यांना त्यांच्या पारंपरिक ज्ञानाबरोबरच नवीन तंत्र शिकण्यासाठी प्रशिक्षण देणार आहे, जेणेकरून उत्पादनांचा दर्जा सुधारून त्यांना बाजारपेठेसाठी तयार करता येईल. याशिवाय या कारागिरांना सरकारकडून नवीन आधुनिक उपकरणेही दिली जाणार आहेत.

प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना प्रमुख वैशिष्ट्ये

प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेमध्ये अठरा व्यवसायामध्ये  सुतार, होड्या बनवणारे, हत्यारे बनवणारे, लोहार, टाळा बनवणारे, हातोडा आणि टूलकिट बनविणारे, सोनार, कुंभार,  मूर्तीकार, चांभार, मेस्त्री, चटई आणि झाडू बनवणारे, पारंपारिक बाहुल्या आणि खेळणी बनवणारे, न्हावी, हार बनवणारे, धोबी, शिंपी, माशाचे जाळे विणणारे कारागीर या कारागिरांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

या विविध 18 व्यवसायांच्या लाभार्थ्यांना 5 दिवसांचे कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. लाभार्थ्यांना संबंधित व्यवसायाच्या टूलकिटसाठी 15 हजार रुपयांचे ई-व्हाऊचर विद्यावेतन देण्यात येणार आहे. प्रशिक्षणानंतर पात्र लाभार्थ्यांना एक लाख रकमेचे 5 टक्के व्याजदराने कर्ज मिळेल.पहिल्या हप्त्याच्या कर्जाची परतफेड नियमित असल्यास लाभाथ्यांना पुढील दोन लाख रुपये रकमेचे 5 टक्के व्याजदराचे कर्ज मिळेल. वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षणास सुरुवात करण्यात येणार आहे.राज्यातील 15 जिल्ह्यांमधील 101 प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षणात सुरुवात करण्यात येणार आहे.

पीएम विश्वकर्मा योजनेच्या पहिल्या टप्प्यात या 18 पारंपरिक उद्योगांचा समावेश

ही योजना देशाच्या  ग्रामीण आणि शहरी भागातील हस्त-कलाकार आणि कारागिरांना मदत करेल. पीएम विश्वकर्मा योजनेच्या पहिल्या टप्प्यात अठरा पारंपरिक उद्योगांचा समावेश केला जाणार आहे. 

(i) सुतार (ii) होडी बांधणी कारागीर (iii) चिलखत बनवणारे (iv) लोहार (v) हातोडी आणि अवजार संच बनवणारे (vi) कुलूप बनवणारे (vii) सोनार (viii) कुंभार (ix) शिल्पकार (मूर्तिकार, दगडी कोरीव काम), पाथरवट (दगड फोडणारे) (x) चर्मकार (पादत्राणे कारागीर) (xi) मेस्त्री (xii) टोपल्या/चटया /झाडू/ कॉयर साहित्य कारागीर (xiii) बाहुल्या आणि खेळणी (पारंपरिक) बनवणारे (xiv) न्हावी (केश कर्तनकार) (xv) फुलांचे हार बनवणारे कारागीर (xvi) परीट (धोबी) (xvii) शिंपी आणि (xviii) मासेमारचे जाळे विणणारे. 

PM विश्वकर्मा यांचा लाभ तुम्हाला कसा मिळेल?

पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचा लाभ 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कोणत्याही व्यक्तीला मिळू शकतो जो हाताने काम करत असेल किंवा त्याच्या कुटुंबाचे काम कोणत्याही प्रकारच्या कारागिरीशी संबंधित असेल. सध्या या योजनेचा लाभ सुतार, लोहार, कुंभार आणि विणकर अशा एकूण 18 नोकऱ्यांसाठी उपलब्ध आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रांची आवश्यकता असेल. यामध्ये आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, कामाचा दाखला, मोबाईल क्रमांक, बँक खात्याची माहिती, उत्पन्नाची माहिती आणि गरज असेल तेथे जातीची माहिती यांचा समावेश आहे. लोकांना त्यांच्या जवळच्या सामान्य सेवा केंद्रातून या योजनेबद्दल अधिक माहिती मिळेल.

ही बातमी वाचा :

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts