Paytm Crisis if you have Paytm Payments bank account then do this process before 15th March otherwise your salary will be stuck marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई: पेटीएम पेमेंट्स बँकेवरील (Paytm Payments Bank) आरबीआयच्या ताज्या कारवाईनंतर पेटीएमचे कोट्यवधी ग्राहक चिंतेत आहेत. पेटीएम पेमेंट्स बँकेत ज्यांनी बचत किंवा चालू खाते उघडले आहे अशा ग्राहकांची संख्या मोठी आहे. असे अनेक लोक आहेत ज्यांचे पगार पेटीएम पेमेंट्स बँकेत उघडलेल्या बँक खात्यांमध्ये जमा होतात. आता रिझर्व्ह बँकेच्या कारवाईनंतर त्यांना अडचणी येऊ शकतात. अशा ग्राहकांनी काय करावं याची माहिती रिझर्व्ह बँकेने दिली आहे. 

रिझर्व्ह बँकेने प्रश्नोत्तरे जारी केले

पेटीएम पेमेंट्स बँकेवर रिझर्व्ह बँकेने केलेल्या कारवाईनंतर लोकांच्या मनात अनेक शंका निर्माण होत आहेत. त्यासंबंधीचे सर्व प्रश्न निकाली काढण्याच्या प्रयत्नात रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी एक एफएक्यू जारी केले आहे. FAQ मध्ये, रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बँकेच्या वॉलेट आणि फास्टॅगसह इतर सर्व सेवांची माहिती दिली आहे. त्यात पेटीएम पेमेंट्स बँकेच्या बचत आणि चालू खात्यांचाही समावेश आहे.

15 मार्चपर्यंत मुदत वाढवली

31 जानेवारी रोजी रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बँकेवर केलेल्या कारवाईची माहिती दिली. रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बँकेला नवीन ग्राहक जोडण्यास आणि कर्ज देण्यावर तात्काळ बंदी घातली. त्याचवेळी 29 फेब्रुवारीनंतर पेटीएम पेमेंट्स बँक खाते, वॉलेट इत्यादींमध्ये पैसे जमा करण्यावर बंदी असेल असे सांगण्यात आले. आता या प्रकरणी आरबीआयने थोडा दिलासा दिला असून 29 फेब्रुवारीची मुदत 15 मार्चपर्यंत ढकलली आहे.

उर्वरित शिल्लक रकमेवर कोणतेही बंधन राहणार नाही

RBI FAQ नुसार, पेटीएम पेमेंट्स बँकेत उघडलेली बँक खाती 15 मार्चनंतरही बंद होणार नाहीत. जर तुमचे पेटीएम पेमेंट्स बँकेत बचत किंवा चालू खाते उघडले असेल आणि त्यात पैसे असतील, तर तुम्ही 15 मार्चनंतरही काढू शकता जसे तुम्ही आतापर्यंत करत आहात. जोपर्यंत तुमच्या खात्यात शिल्लक आहे तोपर्यंत त्याच्या वापरावर कोणतेही बंधन नाही.

15 मार्चनंतर पगार मिळणार नाही

रिझर्व्ह बँकेने मुदत वाढवून दिलेल्या सवलतीनुसार, 15 मार्चनंतर पेटीएम पेमेंट्स बँकेच्या वॉलेटमध्ये, बचत किंवा चालू खात्यात पैसे जमा होणार नाहीत. याचा अर्थ असा की जर तुमचा पगार पेटीएम पेमेंट्स बँकेच्या खात्यात आला, तर तुम्हाला 15 मार्चनंतर अडचणी येऊ शकतात. कारण तुमचा पगार पेटीएम पेमेंट्स बँकेच्या खात्यात जमा होणार नाही. ही समस्या टाळण्यासाठी तुम्ही आगाऊ दुसऱ्या बँकेत नवीन खाते उघडावे आणि तुमच्या बँकेकडे त्याची माहिती अपडेट करावी.

 फक्त हेच व्यवहार होतील

तुम्ही तुमच्या इतर कोणत्याही खात्यातून पेटीएम पेमेंट बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकत नाही. रिझर्व्ह बँकेने FAQ मध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की, 15 मार्चनंतर फक्त व्याज, कॅशबॅक, स्वीप-इन आणि भागीदार बँकांचे पैसे परतावा Paytm पेमेंट्स बँकेच्या खात्यात येऊ शकतात. याशिवाय 15 मार्च नंतर पेटीएम पेमेंट्स बँक खात्यात इतर कोणत्याही प्रकारचे क्रेडिट उपलब्ध होणार नाही.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts