Video : काझिरंगामध्ये पहिल्यांदाच दिसला सोनेरी झळाळी असणारा दुर्मिळ वाघ; रुबाबदार चाल पाहतच राहाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kajiranga national park golden tiger : आसामच्या काझिरंगा राष्ट्रीय उद्यानाला भेट देणाऱ्यांची संख्या तुलनेनं मोठी आहे. इथं येऊन महागाय गेंडा पाहत त्याचा अधिवास नेमका कुठं असतो याबाबतचं बारकाव्यानं निरीक्षण करण्याला अनेकांचं प्राधान्य असतं. अशा या काझिरंगा राष्ट्रीय उद्यानामध्ये इतरही अनेक प्राणी आणि पक्ष्यांचा वावर आहे. अशा या राष्ट्रीय उद्यानात नुकताच एक असा प्राणी दिसला, जो पाहताना अनेकजण थक्क झाले.  काझिरंगा राष्ट्रीय उद्यानात नुकताच दिसलेला हा लक्षवेधी प्राणी म्हणजे देशातील एकमेव सोनेरी झळाळी असणारा वाघ. सध्या सोशल मीडियावर याच वाघाचे फोटो आणि व्हिडीओ प्रचंड शेअर केले…

Read More