आरोग्याची काळजी घ्या म्हणताच स्टेजवर कोसळले प्रा. समीर खांडेकर; Heart Attack ने निधन

( प्रगत भारत । pragatbharat.com) IIT Kanpur : आयआयटी कानपूरच्या एका वरिष्ठ प्राध्यापकाचा व्याख्यान देताना मृत्यू झाला आहे. 22 डिसेंबर रोजी आयआयटी कानपूरचे प्राध्यापक समीर खांडेकर (Pvt Sameer Khandekar) हे विद्यार्थी कल्याण कार्यक्रमात व्याख्यान देत होते. लोकांना त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी हे समीर खांडेकर सांगत होते. त्याचवेळी खांडेकर हे स्टेजवरच खाली कोसळले. त्यानंतर खांडेकर यांना रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. शवविच्छेदन अहवाल अद्याप आलेला नसला तरी हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आल्याचा संशय डॉक्टरांना आहे. प्राध्यापक समीर खांडेकर हे 22 डिसेंबर रोजी आयआयटीच्या सभागृहात माजी विद्यार्थी मेळाव्याला…

Read More