महाविकास आघाडीच्या जागावाटपासंदर्भात पवारांचं सूचक विधान! म्हणाले, ‘मी स्वत:..’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sharad Pawar On INDIA Alliance Seat Sharing: राज्यसभेचे खासदार तसेच ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कोल्हापूरमधील पत्रकार परिषदेमध्ये लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात भाष्य केलं आहे. भारतीय जनता पार्टीने कितीही घोषणा केल्या तरी निवडणूकपूर्व सर्वेक्षणांचे कल पाहिल्यास लोकसभेच्या निम्म्याहून अधिक जागा ‘इंडिया’ आघाडी जिंकेल असं पवार म्हणालेत. तसेच महाविकास आघाडीमध्ये महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 पैकी 39 जागांवर एकमत झाल्याचंही पवारांनी सांगितलं. उर्वरित जागांसंदर्भातील चर्चेसाठी उद्या महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची बैठक होणार असल्याची माहिती पवार यांनी दिली. काही राज्यांमध्ये वाद “अलिकडे इंडिया आघाडीची बैठक झालेली नाही.…

Read More