Ayodhya Ram Temple: ‘नरेंद्र मोदींनी 11 दिवस उपवास ठेवला काय याबाबत शंकाच आहे,’ काँग्रेस नेत्याचं विधान

( प्रगत भारत । pragatbharat.com) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी 11 दिवस उपवास ठेवला होता. प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी विशेष 11 दिवसीय धार्मिक अनुष्ठान सुरू केलं होतं. नाशिक दौऱ्यात पंचवटी येथून त्यांनी धार्मिक अनुष्ठानांना सुरुवात केली होती. नरेंद्र मोदींनी कठोर व्रत पाळत फक्त नारळपाणीचं सेवन केलं. पण काँग्रेस नेते वीरप्पा मोईली यांनी नरेंद्र मोदींनी खरंच 11 दिवस उपवास ठेवला का? अशी विचारणा करत शंका व्यक्त केली आहे.  प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना वीरप्पा मोईली यांनी सांगितलं की, “मी डॉक्टरसह मॉर्निंग वॉकला गेलो असता त्याने मला एखादी व्यक्ती…

Read More

'आम्ही प्रभू श्रीरामाचे वंशज,' वरिष्ठ नेत्यांनी निमंत्रण नाकारल्यानंतर काँग्रेस नेत्याचं मोठं विधान, 'हे रामाला आणणारे…'

( प्रगत भारत । pragatbharat.com) अयोध्येत 22 जानेवारीला राम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. एकीकडे यासाठी तयारी जोरात सुरु असताना दुसरीकडे राजकीय नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलं आहे.   

Read More

‘भगवान श्री कृष्ण आम्हाला जावयाप्रमाणे, कारण…’; जाहीर भाषणात मुख्यमंत्र्यांचं विधान

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lord Krishna Is Our Son In Law: आपल्या वादग्रस्त भूमिकांबरोबरच वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा हे पुन्हा एकदा त्यांच्या विधानामुळे चर्चेत आले आहेत. हरियाणामधील कुरुक्षेत्र येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘अंतरराष्ट्रीय गीता मोहोत्सव’च्या कार्यक्रमामध्ये बिसवा यांनी हे विधान केलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं हिमंत बिस्वा सरमा यांचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.  नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री ‘अंतरराष्ट्रीय गीता मोहोत्सव’च्या कार्यक्रमात भाषण करताना हिमंत बिस्वा सरमा यांनी, “भगवान श्री कृष्णाला आम्ही आमचा जावई मानतो,” असं म्हटलं आहे. “भगवान श्री कृष्णाबरोबर आमचा फार जुना संबंध आहे. आम्ही…

Read More

‘इस्लामला युरोपमध्ये स्थान नाही, इस्लामीकरणाचे प्रयत्न..’; इटालियन PM मेलोनींचे स्फोटक विधान

( प्रगत भारत । pragatbharat.com) Italy PM Giorgia Meloni On Islam in Europe: इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी यांनी इस्लाम धर्मासंदर्भात केलेल्या विधानामुळे त्या चर्चेत आल्या आहेत. युरोपमध्ये इस्लामिक संस्कृतीला कोणतंही स्थान नसल्याचं विधान मेलोनी यांनी केलं आहे. या विधानामुळे मेलोनी यांच्यावर टीका होताना दिसत आहे. “यूरोपचं इस्लामीकरण करण्याचा बराच प्रयत्न झाला. मात्र इस्लाममधील मूल्य युरोपीयन संस्कृतीबरोबर साधर्म्य साधणारी नाहीत. यूरोपीयन संस्कृती आणि इस्लामिक संस्कृतीमधील अनेक गोष्टी एकमेकांशी मिळत्या जुळत्या नाहीत. मूल्य आणि अधिकाऱ्यांच्या बाबतीतही फार मोठा फरक आहे. त्यामुळेच यूरोपमध्ये इस्लामिक संस्कृतीला कोणतंही स्थान नाही,” असं मेलोनी म्हणल्या आहेत.…

Read More

‘गुजरातची प्रगती झाली तर देशाची प्रगती’; सुरतमधल्या डायमंड बोर्सच्या उद्घाटनानंतर पंतप्रधानांचे महत्त्वाचे विधान

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Narendra Modi inaugurated Surat Diamond Bourse : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज गुजरात दौऱ्यावर आहेत. यावेळी पंतप्रधान मोदींना डायमंड सिटी गुजरातला दोन मोठ्या भेटवस्तू दिल्या आहे. पहिली भेट म्हणजे सुरत विमानतळाची नवीन टर्मिनल इमारत आणि दुसरी जगातील सर्वात मोठे ऑफिस कॉम्प्लेक्स (Surat Diamond Bourse). सुरत येथे पोहोचल्यानंतर आणि नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सूरत शहराजवळील खजोद गावात बांधलेल्या सूरत डायमंड बोर्स (SDB) इमारतीचे उद्घाटन केले. हे मोदींच्या गॅरंटीचे उदाहरण आहे. सुरत शहराच्या वैभवात आज आणखी एका हिऱ्याची भर पडली असून…

Read More

‘महात्मा गांधी आज जिवंत असते तर त्यांनी मोदींच्या…’; मोदींची गांधींशी तुलना करत उपराष्ट्रपतींचं विधान

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vice President Dhankar Controversy: भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना महात्मा गांधींबरोबर केली आहे. धनखड यांनी महात्मा गांधींना मागील शतकातील महापुरुष असल्याचं सांगताना पंतप्रधान मोदी हे सध्याच्या शतकातील युगपुरुष असल्याचं म्हटलं आहे. विरोधी पक्षांसहीत अनेक पक्षांनी या तुलनेवरुन उपराष्ट्रपतींवर टीका केली आहे. काँग्रेसच्या एका खासदाराने धनखड यांचं हे विधान लज्जास्पद असल्याचं म्हटलं आहे. नेमकं काय म्हणाले उपराष्ट्रपती? 27 नोव्हेंबर रोजी मुंबईमध्ये आत्मकल्याण दिवसानिमित्त आयोजित कर्यक्रमाला धनखड यांना मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळेस त्यांनी दिलेल्या भाषणामध्ये धनखड यांनी, “मी तुम्हाला सांगू…

Read More

मोठी बातमी! हिंदूंबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या काँग्रेस आमदाराला अटक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Congress MLA  Arrested: आसाम पोलिसांनी हिंदू समाजाबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या एका आमदाराला अटक केली आहे. अटक करण्यात आलेला आमदार हा काँग्रेसचा आहे. आफताब उद्दीन मोल्ला असं अटक करण्यात आलेल्या आमदाराचं नाव असून त्याने हिंदू समाजाबरोबरच हिंदू मंदिरांबद्दल वादग्रस्त विधानं केली होती. हिंदू समाजाविरोधात धक्कादायक विधान काँग्रेस आमदार आफताब यांना 7 नोव्हेंबर रोजी गुवहाटी येथून अटक करण्यात आली. आमदार वाजेद अली चौधरी यांच्या निवासस्थानी असताना आफताब यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. आफताब यांनी हिंदू समाजाविरोधात वादग्रस्त विधानं केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आफताब यांनी गोलपारा येथील एका जाहीर…

Read More

‘लग्नानंतर पुरुष रोज रात्री करतात ना…’, मुख्यमत्र्यांच्या थेट विधानसभेत आक्षेपार्ह विधान

( प्रगत भारत । pragatbharat.com) बिहारमध्ये जातीवर आधारित सर्व्हेची आकडेवारी सादर करण्यात आली आहे. विधानसभेत ही आकडेवारी सादर करण्यात आली. दरम्यान ही आकडेवारी सादर करताना झालेल्या चर्चेदरम्यान नितीश कुमार यांनी केलेल्या एका विधानामुळे वाद पेटला आहे. नितीश कुमार यांनी लोकसंख्या नियंत्रण आणि महिलांच्या शिक्षणाचं महत्त्व सांगण्याचा प्रयत्न करताना असं काही विधान केलं ज्यामुळे विधानसभेतील आमदारांच्या भुवया काहीशा उंचावल्या होत्या.  चर्चेदरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारमध्ये महिलांची साक्षरता वाढली आहे. जर मुलगी शिकलेली असेल तर लोकसंख्या नियंत्रणात राही असं सांगितलं. हे समजावून सांगताना ते म्हणाले की, “जर मुलगी शिकली असेल तर…

Read More

‘सुप्रीम कोर्ट फक्त तारीख पे तारीख…’, सरन्यायाधीशांचं मोठं विधान

( प्रगत भारत । pragatbharat.com) सर्वसामान्याने कधीही कोर्टाची पायरी चढू नये असं वारंवार म्हटलं जातं. कारण एकदा कोर्टाची पायरी चढली तर वारंवार खेपा माराव्या लागतात. कोर्टात फक्त तारीखच मिळते अशी खंतही वारंवार सर्वसामान्य व्यक्त करत असतात. दरम्यान याच मुद्द्यावर आता थेट सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनीच भाष्य केलं आहे. सरन्यायाधीशांनी थेट वकिलांनाच गरज असल्याशिवाय उगाच खटला स्थगित करण्याची मागणी करु नका असा सल्ला दिला आहे. सुप्रीम कोर्ट हे फक्त तारखा देणारं कोर्ट होऊ नये असंही त्यांनी सांगितलं आहे.  सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी शुक्रवारी अशा प्रकरणांची माहिती दिली, जी स्थगित…

Read More

‘पूर्णपणे सहमत’; नारायण मुर्तींच्या ’70 तास काम करा’ वक्तव्यावर प्रसिद्ध उद्योगपतीचं लक्षवेधी विधान

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bhavish Aggrawal on Narayan Murthy: काही दिवसांपुर्वी इन्फोसिसचे संस्थापक नारायण मुर्ती यांनी एक विधान केले होते ज्याची बरेच दिवस चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. जगाशी स्पर्धा करायची असेल तर तरूणांनी आठवड्याला 70 तास काम करायला हवं यावर त्यांनी आपलं मतं माडलं होतं. त्यावर जगभरातून विविध प्रतिक्रिया येयला सुरूवात झाली होती. अनेक सेलिब्रेटींनी आणि विचारवंतांनी यावर आपली मतं मांडायला सुरूवात केली होती. त्यातून काही जणं त्यांच्याशी सहमत होते तर त्यातील काहींनी त्यांच्या या विधानावर आपली नाराजी दर्शवली होती. त्यामुळे त्यांची विशेष चर्चा रंगली. आताही त्यांच्या या विधानावर मतंमतांतरे…

Read More