पत्नीवर ‘बेवफाई’चे आरोप करणाऱ्या आलोक मौर्याचा यूटर्न; ज्योतीवरील सर्व आरोप मागे घेतले, कारण काय?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Jyoti Maurya Case: उत्तर प्रदेशची पीसीएस अधिकारी ज्योती मौर्य आणि तिचे पती अलोक मोर्य यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला होता. मीडियासमोर आपलं रडगाणं ऐकून दाखवणारे अलोक मौर्य यांनी अचानक युटर्न घेतला आहे. तसंच, ज्योतीवर लावण्यात आलेले सर्व आरोपही मागे घेतले आहे. अलोक मौर्यच्या निर्णयामुळं एकच चर्चा रंगली आहे. अलोक मौर्य यांनी अचानक युटर्न का घेतला याबाबत त्यांना विचारणा होत असून त्यांनी मात्र यावर बोलणं टाळलं आहे.  अलोक मौर्य यांना सोमवारी प्रयागराज येथील अपर आयुक्त अमृत लाल बिंद यांच्यासमोर हजर होऊन पत्नी ज्योती मौर्यविरोधात साक्ष द्यायची होती.…

Read More