( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News Today: दोन बायकांनी मिळून त्यांच्याच पतीचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आलमगीर अन्सारी (45 वर्ष) असं मयत व्यक्तीचे नाव आहे. आलमगीरने सहा महिन्यांपूर्वीच दुसरा निकाह केला होता. पत्नीसह तो गावाला आला असतानाच दोन्ही पत्नींनी मिळून त्याची हत्या केल्याचं तपासात उघड झालं आहे. पोलिसांनी दोघींना अटक केली आहे. तसंच, या प्रकरणात अधिक तपास सुरु आहे. आलमगीर अन्सारी हा बिहारमधील रायपुरा गावातील रहिवासी आहे. अन्सारी दिल्लीत राहत होता. तर तिथेच काम करुन उदरनिर्वाह चालवत होता. आलमगीर अन्सारीचे 10 वर्षांपूर्वी पहिले लग्न झाले होते.…
Read More