Chandrayaan-3 successful landing of ISROs Aditya-L1 will explore the Sun;चंद्र आला मुठीत, आता सूर्याची पाळी; इस्रोने जाहीर केली मोहिमेची वेळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) ISRO Surya Mission 2023 Launching: चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग केल्यानंतर भारतीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यानंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांचे जगभरातून कौतूक होत आहे. चांद्रयान-3 मिशन यशस्वी झाल्यानंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांनी सुर्य आणि शुक्राच्या दिशने आगेकूच करायचे ठरवले आहे.  चांद्रयान-3 चे यशस्वी लँडिंग होताच बुधवारी संध्याकाळी उशिरा याबद्दल घोषणा करण्यात आली. चंद्रानंतर इस्रो आता आपले ‘आदित्य-एल1’ सूर्यावर संशोधन करण्यासाठी सूर्याकडे पाठवणार आहे. ही सूर्य मोहीम पाठवण्याची योग्य वेळही त्यांनी जाहीर केली. यासोबतच शुक्र मोहिमदेखील लवकरच सुरु केली जाणार आहे.  15 किमीचा प्रवास 4 महिन्यात सूर्य मोहिमेसाठी ‘आदित्य-एल1’ उपग्रह…

Read More