( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi Rain: राजधानी दिल्लीत (Delhi) पावसाने धुमाकूळ घातला आहे. पावसामुळे सर्व यंत्रणा कोलमडली असून ठिकठिकाणी पाणी भरलं आहे. रस्त्यांपासून ते अनेक गल्ल्या, अंडरपास पाण्याखाली बुडाले आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या अडचणी वाढल्या असून, पाण्यातून प्रवास करण्याची वेळ आली आहे. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी घुसलं आहे. दरम्यान, परिस्थितीशी तोंड देण्यासाठी दिल्ली सरकारने सर्व मनुष्यबळ कामाला लावलं आहे. दिल्ली सरकारने सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची रविवारची सुट्टी रद्द केली आहे. या सर्व अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन सर्व परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दिल्लीत (Delhi) तब्बल 41 वर्षांनी रेकॉर्डब्रेक पाऊस (Rain)…
Read More