Chandrayaan 3: चंद्र नेमका कसा दिसतो? पाहा विक्रम लँडरवरील कॅमेऱ्याने शूट केला VIDEO

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandrayaan-3 23 ऑगस्टला चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिग करणार आहे. त्याआधी 17 ऑगस्टला चांद्रयानच्या मुख्य यानापासून (प्रोपल्शन मॉडेल) विक्रम लँडर वेगळं झालं आहे. त्यानंतर डीबूस्टिंग प्रक्रियाही यशस्वी झाली आहे. त्यानंतर आता सर्वांचं लक्ष लँडिगकडे लागलं असतानाच इस्रोने चंद्राचा व्हिडीओ शेअर केला आहे. विक्रम लँडरवर लावण्यात आलेल्या LPDC म्हणजेच लँडर पोझिशन डिटेक्शन कॅमेराने हा व्हिडीओ शूट करण्यात आला आहे. या व्हिडीओत चंद्राचा पृष्ठभाग दिसत आहे.  LPDC विक्रम लँडरच्या खालच्या बाजूला लावण्यात आला आहे. विक्रम लँडर आपल्या लँडिगसाठी योग्य आणि सपाट पृष्ठभाग शोधू शकेल यासाठी हा कॅमेरा तिथे लावण्यात…

Read More