निकालानंतर बदलणार INDIA आघाडीची समीकरणे; काँग्रेसची जागा वाटपासाठी नवी खेळी?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Assembly Elections Result 2023 and INDIA:  2024 च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी झालेल्या राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांच्या निवडणूक निकालांकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. या निवडणुकीला लोकसभेची निवडणुकीच्या आधीची सेमीफायनल म्हटलं जात आहे. हा निवडणूक निकाल इंडिया आघाडी (इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्स) आणि एनडीए दोन्हीसाठी महत्त्वाचे असणार आहेत. हा निकाल इंडिया आघाडीच्या बाजूने आला, तर सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांचा आत्मविश्वास वाढणार हे खरं आहे. पण निकाल एनडीएच्या बाजूने लागला तर येत्या लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला मोठी कसरत करावी लागणार आहे. इंडिया आघाडीसाठी…

Read More