( प्रगत भारत । pragatbharat.com) सुप्रीम कोर्टातील 61 वर्षीय महिला वकील रेणु सिन्हा यांच्या हत्येप्रकरणी धक्कादायक खुलासे झाले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी रेणु सिन्हा यांच्या पतीला अटक केली आहे. हत्या केल्यानंतर पती घराच्या स्टोअर रुममध्ये लपून बसला होता. पोलिसांनी हत्येच्या 24 तासानंतर त्याला ताब्यात घेतलं होतं. चौकशीदरम्यान, त्यानेच हत्या केल्याचं उघड झालं. पोलिसांनी मृत्यूचं कारण समजून घेण्यासाठी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला होता. यानंतर काही धक्कादायक खुलासे झाले आहे. शवविच्छेदनातून समोर आलं आहे की, रेणु सिन्हा यांची गळा दाबून हत्या करण्यात आली. दरम्यान, गळा दाबण्याआधी त्याच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर गंभीर इजा झाली होती…
Read More