( प्रगत भारत । pragatbharat.com) Bacchu Kadu on Navneet Rana:अमरावती लोकसभा मतदार संघातून भाजपकडून नवनीत राणांना उमेदवारी जाहीर झाली. असे असले तरी महायुतीमध्ये असलेल्या अनेक नेत्यांना हा निर्णय पटलेला दिसत नाही. त्यांनी सुरुवातीपासूनच नवनीत राणांच्या नावाला विरोध केला. आता प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी नवनीत राणांवर टीका केली. काल आमची नांदेडला एक बैठक झाली आणि जालना, अहमदनगर, बीड या जिल्ह्यातील प्रमुखांची बैठक संभाजीनगरला झाली. लोकसभेबाबत आपण काय केले पाहिजे आणि कशा पद्धतीने समोर गेलं पाहिजे यासाठी ही बैठक झाल्याचे बच्चू कडुंनी सांगितले. आम्हाला भरपूर त्रास झालाय असे कार्यकर्त्यांनी सांगितले.…
Read More