[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
जन्मानंतर बाळाचा रंग बदलला
महिलेने मेहसाणा येथील रुग्णालयात सी-सेक्शनद्वारे बाळाला जन्म दिला, परंतु त्यानंतर बाळाचे संपूर्ण शरीर निळे झाले आणि त्याचा रक्तदाब कमी होऊ लागला. त्यानंतर रुग्णालयाने बाळाला अहमदाबाद येथील नवजात शिशु रुग्णालयात हलवले.
बाळामध्ये निकोटीनची उच्च पातळी
डॉक्टरांनी सांगितले की, सुरुवातीच्या गोष्टी पाहता हे गुदमरल्यासारखे वाटत होते, परंतु मुलामध्ये असामान्य लक्षणे दिसू लागली. मुलाची बारकाईने तपासणी केली असता मुलाच्या शरीरात मोठ्या प्रमाणात निकोटीन असल्याचे आढळून आले. मुलाच्या आईला तंबाखूचे व्यसन होते ही धक्कादायक माहिती नंतर समोर आली. त्याचा परिणाम गर्भात वाढणाऱ्या मुलावर झाला आहे.
(वाचा – ब्लोटिंग, अॅसिडिटी आणि सततच्या ढेकरमुळे चारचौघात लाज वाटते, बटाट्याच्या ज्युसने काही सेकंदात दूर होईल हा त्रास)
निकोटीन रक्तप्रवाहाद्वारे गर्भापर्यंत पोहोचते
मुलाच्या शरीरात एवढ्या मोठ्या प्रमाणात निकोटीन आढळल्यानंतर डॉक्टरांनी आई आणि मुलाचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यानंतर स्त्रीरोग तज्ज्ञांशी संवाद साधला असता असे आढळून आले की, महिलेला तंबाखूचे व्यसन होते आणि ती दिवसातून 10-15 वेळा तंबाखूचे सेवन करते, त्यामुळे निकोटीन रक्ताद्वारे गर्भापर्यंत पोहोचले.
गुजरातमध्ये लोक मोठ्या प्रमाणावर तंबाखूचे सेवन करतात. 2020 च्या सर्वेक्षणानुसार, राज्यातील 41 टक्के पुरुष आणि 8.7 टक्के महिला नियमितपणे तंबाखूचे सेवन करतात.
महिला वयाच्या १५व्या वर्षापासून तंबाखू खात होती
आपल्या तंबाखूच्या सवयीबद्दल पश्चात्ताप करत महिलेने सांगितले की, तिला वयाच्या १५व्या वर्षापासून तंबाखूचे व्यसन होते, पण ती आपल्या मुलाच्या जीवाला धोका निर्माण होईल याची तिला कल्पना नव्हती. पाच दिवसांच्या उपचारानंतर बाळाच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. तसेच, डॉक्टरांनी बाळाला स्तनपान करताना तंबाखूचे सेवन न करण्याचा सल्ला दिला आहे, कारण फक्त आईच्या दुधामुळेच बाळ बरे होण्यास मदत होते.
निकोटीनचा गर्भावस्थेत होणारा परिणाम
निकोटीन धूम्रपान केल्याने बाळंतपणाच्या वयातील स्त्रीच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो, जसे की, ब्लॉकेजेससह फॅलोपियन ट्यूबला नुकसान होते. एक्टोपिक गर्भधारणा आणि पहिल्या तिमाहीत गर्भपात, अचानक किंवा असामान्य प्लेसेंटेशन आणि प्रीक्लेम्पसिया एलपी सारख्या असामान्य गर्भधारणेचा वाढीव धोका देखील आहे, ज्यामुळे गर्भाच्या वाढीस हानी पोहोचू शकते. हे अंडी उत्पादनास देखील हानी पोहोचवू शकते, ही माहिती डॉ जेसल शेठ, वरिष्ठ सल्लागार-बालरोगतज्ञ, फोर्टिस हॉस्पिटल, मुलुंड यांनी दिली आहे.
बाळामध्ये दिसतात हे सिंड्रोम
हे गर्भवती महिलांसाठी हानिकारक आहे कारण निकोटीन प्लेसेंटा ओलांडू शकते आणि जन्मानंतर नवजात मुलांमध्ये लक्षणीय सिंड्रोम होऊ शकते. इतकेच नाही तर, गर्भधारणेदरम्यान धूम्रपान केल्याने न जन्मलेल्या मुलांचे नुकसान होऊ शकते. तसेच मेंदू किंवा फुफ्फुसातील ऊतींचे नुकसान होऊ शकते आणि यामुळे लहान मुलांमध्ये ओठ फाटण्याचा धोका देखील वाढतो.
गरोदरपणात आईने निकोटीनचे जास्त सेवन केल्याने बाळाच्या जन्मानंतर लगेचच रक्तदाब कमी होणे, फेफरे येणे आणि हृदय श्वासोच्छवासाची समस्या होऊ शकते.
टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.
[ad_2]