( प्रगत भारत । pragatbharat.com)
PM Modi UAE Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) दोन दिवसांचा फ्रान्सचा दौरा आटपून यूएईमध्ये (UAE) दाखल झाले आहेत. पीएम मोदी यांचं अबू धाबी (Abu Dhabi Airport) विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आलं. क्राऊन प्रिंस शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान (Sheikh Mohamed bin Zayed Al Nahyan) यांनी त्यांचं स्वागत केलं. विशेष म्हणजे पीएम मोदींच्या स्वागतासाठी दुबईतील जगातल्या सर्वात उंच बुर्ज खलीफा (Burj Khalifa) इमारतीवर भारताच्या तिरंग्यासह पीएम मोदींचा फोटो झळकला. वेलकम ऑनरेबर प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी अशा अक्षरात बूर्ज खलिफावर लाईटिंग करण्यात आली होती.
यूएई दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी संयूक्त अरब अमीरातचे राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांच्याबरोबर द्वीपक्षीय मुद्दयांवर चर्चा करणार आहेत. चर्चेनंतर दोनही नेते एकत्र जेवण करतील आणि संध्याकाळी पीएम मोदी दिल्लीसाठी रवाना होतील. पंतप्रधान बनल्यानंतर नरेंद्र मोदी यांचा हा पाचवा यूएई दौरा आहे. 2015 ऑगस्टला पीएम मोदी यांनी संयुक्त अरब अमीरातचा पाहिला दौरा केला होता. 34 वर्षानंतर एखाद्या भारतीय पंतप्रधानांचा तो पहिला यूएई दौरा होता.
भारत आम संयूक्त अरब अमीरात सरकारदरम्यान उर्जा, खाद्य, सुरक्षा आणि संरक्षणासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. संयुक्त अरब अमीरातीचा दौरा करण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांच्या भेटीसाठी आपण उत्सुक असल्याचं म्हटलं होतं. दोन्ही देशात व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, अन्न सुरक्षा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, शिक्षण, फिनटेक, संरक्षण, सुरक्षेचे मजबूत संबंध आहेत.
दोन्ही देशातले हे संबंध आणखी दृढ करण्यासाठी ही भेट महत्त्वाची ठरेल असं पीए मोदी यांनी म्हटलं आहे. आताचा संयूक्त अरब अमीरातीचा दौरापासून एक नवा अध्याय सुरु होईल असा विश्वास पीएम मोदींनी व्यक्त केला.
फ्रान्स दौऱ्यात मोदींचा सन्मान
त्याआधी फ्रान्स दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फ्रान्समधला सर्वोच्च सन्मान देऊन गौरव करण्यात आला. पीएम मोदी यांनी ग्रँड क्रॉस ऑफ लीजन ऑफ ऑनर या पुरस्कार देण्यात आला. हा सन्मान मिळणावरे पीएम मोदी भारताचे पहिले पंतप्रधान आहेत. याआधी दक्षिण आफ्रिकेचे पूर्ण राष्ट्रपती नेल्सन मंडेला, वेल्सचे तक्कालीन राजकूमार किंग चार्ल्स, जर्मनीचे माजी चान्सलर एंजेला मॉर्केल आणि संयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव बुट्रोस घाली यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.