जगभरात मुद्दामून सोडण्यात आले एक अब्ज डास; बिल गेट्स यांनीही केलं मान्य, म्हणाले ‘मलेरिया, डेग्यू…’

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पावसाळा आला की काही आजार डोकं वर काढतात. पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया हे आजार मोठ्या प्रमाणात बळावतात. या आजारांना साठलेल्या पाण्यातून तयार होणारे मच्छर जबाबदार असतात. यामुळे या मच्छरांच्या संपर्कात येऊन नय यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्याचं आवाहन केलं जातं. पण आता मलेरियाला पूर्णपणे नष्ट करण्यासाठी युकेमधील बायोटेक ऑक्सिटेक कंपनीने सुपर मॉक्सिटो म्हणजेच मच्छर तयार केले आहेत. हे मच्छर मलेरियाला कायमचं संपवतील असा कंपनीचा दावा असून, अब्जाधीश बिल गेट्स यांनीही त्यांना पाठिंबा दिला आहे. इतकंच नाही तर असे एक अब्ज डास जगभरात सोडण्यात आले आहेत. 
 
बिल गेट्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, युकेमधील बायोटेक ऑक्सिटेक (UK biotech Oxitec) कंपनीने सुपक मॉस्किटो तयार केले आहेत, जे आजार पसरवणाऱ्या मच्छरांशी लढण्यास सक्षम आहेत. या आजारांमुळे दरवर्षी 6 लाख लोकांचा मृत्यू होतो. 
 
डेली स्टारने दिलेल्या वृत्तानुसार, ब्रिट-निर्मित हे सर्व डास नर आहेत. हे जास मादींना संतती होऊ नये यासाठी विशेष जनुक धारण करतात. मादी डास चावल्याने मलेरिया होतो हे तर सर्वांनाच माहिती आहे. जर Oxitec ने तयार केलेले डास मादी डासांची सर्व अपत्ये मारतील. अशा प्रकारे मच्छरांची पैदासच बंद होईल आणि यामुळे आजार टाळता येतील. 

डेली स्टारच्या वृत्तानुसार, हे सुपर मच्छर हवामान किंवा मानवासाठी कोणताही धोका निर्माण करत नसल्याचं चाचणीत स्पष्ट झालं आहे. बिल गेट्स यांनी आपल्या ऑनलाइन ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत जगभरात एक अब्जाहून अधिक डास सोडण्यात आले आहेत, ज्यांचा कोणताही नकारात्मक प्रभाव पडलेला नाही. त्यांनी असेही नमूद केलं आहे की, ऑक्सिटेकने डासांच्या पैदासीवर नियंत्रण ठेवण्यासाठी संभाव्य गेम चेंजिंग प्लान तयार केला आहे. ते म्हणाले आहेत की, “डासांविरुद्धची लढाई आणि त्यांच्यामुळे होणारे रोग हा नेहमीच मांजर आणि उंदराचा खेळ झाला आहे”.

माणसाने डासांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी बेड नेट, कीटकनाशके आणि उपचारांसारखे अनेक पर्याय अवलंबले आहेत. पण हे नवे मच्छर त्यांच्या सभोवतालच्या वातावरणाशी जुळवून घेतात.

ब्राझीलमधील ब्रिट बझर्स डासांमुळे होणारा आणखी एक आजार डेंग्यू कायमचा नष्ट करण्यात मदत करत आहेत. डेंग्यूमुळे दरवर्षी 40 हजार लोकांचा मृत्यू होतो.

पुढील वर्षी, मलेरिया रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी पूर्व आफ्रिकेतील जिबूती येथे हे डास सोडले जाणार आहेत. 2012 मध्ये मलेरियाचे 27 हजार आणि 2020 मध्ये ते 73 हजार रुग्ण होते. मायक्रोसॉफ्टच्या संस्थापकांनी जिबूती आणि उर्वरित आफ्रिकेतील प्रकल्पाबद्दल उत्साह व्यक्त केला आहे. 

बिल गेट्स यांनी यावेळी मलेरिया संपवायचा असेल आणि या आजाराचे ओझं कमी करत जगातून पूर्णपणे नष्ट करायचं असेल तर नवी साधनं आणि कल्पनांची आवश्यकता असल्याचं मत व्यक्त केलं आहे. दरम्यान इतर मलेरिया पसरवणाऱ्या डासांमुळे इथिओपिया, सुदान, सोमालिया, केनिया, नायजेरिया आणि घानामध्ये 126 दशलक्ष लोकांना धोका आहे.

Related posts