माणसाला लावण्यात आली डुकराची किडनी, पुढे जे झालं त्याचा विचारत केला नसेल

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pig Kidney Transplants: माणसाच्या शरिरातील प्रत्येक अवयव महत्त्वाचा आहे. पण त्यातही काही अवयव असे आहेत जे जीवन, मृत्यूला कारणीभूत ठरतात. किडनी हा शरिराचा असाच एक महत्त्वाचा भाग असून, शरीरातील टाकाऊ पदार्थ काढून रक्त स्वच्छ करण्याचे काम ते करत असतं. यामुळे किडनी निरोगी राहणं आणि योग्य प्रकारे कार्यरत असणं प्रत्येकासाठी महत्त्वाचं असतं. त्यामुळेच ज्या लोकांची किडनी निकामी  होते, त्यांच्यावर प्रत्यार्पण शस्त्रक्रिया केली जाते. 

नॅशनल किडनी फाऊंडेशननुसार, अमेरिकेतील जवळपास 40 मिलियन लोकांना किडनीचा आजार असून, प्रत्यार्पणादरम्यान रोज 17 लोकांचा मृत्यू होतो. दरम्यान, किडनी ट्रान्सप्लांटचं एक अजब प्रकरण सध्या समोर आलं आहे. डॉक्टरांनी एका व्यक्तीला चक्क डुकराची किडनी बसवली आहे. महत्त्वाचं म्हणजे, ही किडनी अत्यंत चांगल्या प्रकारे काम करत आहे. जर किडनीने योग्य प्रकारे काम केलं, तर वैद्यकीय चमत्कार होईल आणि जग प्राणी आणि माणसांच्या अवयव प्रत्यार्पणाच्या जवळ जाईल. 

एनवाययू लैंगोन हेल्थच्या डॉक्टरांनी 14 जुलै 2023 रोजी ही सर्जरी केली. त्यांनी सांगितलं आहे की, सप्टेंबर मध्यापर्यंत रुग्णाच्या प्रकृतीवर नजर ठेवली जाणार आहे. 

ब्रेन डेड शरिरात प्रत्यार्पण

डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, डुकराच्या किडनीचं प्रत्यार्पण करुन एका महिन्यापेक्षा जास्त काळ झाला आहे. या एका महिन्यात निरीक्षण केलं असता किडनी योग्यप्रकारे काम करत आहे. हे किडनी प्रत्यार्पण 57 वर्षाच्या मौरिस मिलर यांच्यावर करण्यात आलं आहे. त्यांचा ब्रेन डेड झाला आहे. मौरिस यांना मृत घोषित करण्यात आलं होतं आणि व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. ज्यामुळे त्यांचं ह्रदय धडधडत होतं.

आधी फक्त 72 तास जिवंत होता रुग्ण

डॉक्टरांचं म्हणणं आहे की, अनेक वर्षांच्या अपयशानंतर हे यश मिळालं आहे. मागील वेळी जेव्हा एका रुग्णात डुकराच्या किडनीचं प्रत्यार्पण करण्यात आलं होतं तेव्हा तो फक्त 72 तास जिवंत होता. 

10 जनुक्यांमध्ये करण्यात आले बदल

प्रत्यार्पण करण्याआधी डुकराच्या चार जनुकांना किडनीतून काढून टाकण्यात आलं होतं, जे आधीच्या क्रॉस प्रजाती प्रत्यारोपणात अडथळा ठरले होते. यासह डुकराची किडनी माणसाच्या किडनीसारखी असावी यासाठी त्याच्यात सहा मानवी जनुकं टाकण्यात आली होती. 

अशा प्रकारे पार पडलं प्रत्यार्पण

14 जुलै 2023 ला प्रत्यार्पण प्रक्रिया सुरु झाली होती. यावेळी सर्वात आधी डुकराच्या किडनीत अनुवंशिकरित्या बदल करत त्यातील एक जनुकं हटवण्यात आलं, कारण ते मानवाच्या प्रतिकारशक्तीवर हल्ला करत होतं. 

यानंतर डॉक्टरांची टीम न्यूयॉर्कसाठी रवाना झाली. नंतर मौरिस यांच्या शरिरातील किडनी काढल्यानंतर तिथे डुकराच्या किडनीचं प्रत्यार्पण करण्याची प्रक्रिया सुरु झाली. या प्रत्यार्पणाला एक महिना झाला असून, ती अत्यंत चांगल्या प्रकारे काम करत आहे. डॉक्टरांची टीम आणखी एक महिना रुग्णावर लक्ष ठेवणार आहे. 

Related posts