‘ख्याल रखना लँडर भाई…’; Chandrayaan 3 मुळं चंद्र इतका जवळ आलाय, की नेटककरी करतायत सुस्साट कमेंट्स

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Chandrayaan 3 Latest Update : इस्रोच्या (ISRO) चांद्रयान मोहिमेनं आता सर्वांच्याच हृदयाचे ठोके वाढवले आहेत. कारण, आता हे चांद्रयान 3 शेवटच्या टप्प्यात असून, त्याची प्रत्येक चाल ऐतिहासिक ठरत आहे. गुरुवारीच चांद्रयानाचं विक्रम लँडर प्रोपल्शन मॉड्युलपासून वेगळं झालं आणि इथे भारतीयांच्या आनंदाला पारावार उरला नाही. 

X च्या माध्यमातून इस्रोनं माहिती देताक्षणी नेटकऱ्यांनी त्यावर कमेंट करण्यास सुरुवात केली. कोणी चंद्राला मित्र म्हणून संबोधलं, तर कोणी या चांद्रयानाला चंद्रावर हळुवारपणे उतरण्याचा सल्ला दिला. ‘महादेव रक्षा करना’ असं म्हणत कोणी पृथ्वीवरूनच प्रार्थना केल्या तर, कोणी इथं थेट प्रेमाचाच संबंध जोडला. चांद्रयानांबंधीच्या अनेक संज्ञा, त्यातील काही शब्द सर्वांसाठीच नवे. किंबहुना या मोहिमेची तांत्रिक बाजूही अनाकलनीय. पण, ही मोहिम प्रत्येक भारतीयासाठी किती खास आहे हे त्यावर येणाऱ्या कमेंट्समधूनच लक्षात येत आहे. या मोहिमेच्या निमित्तानं चंद्र नेहमीपेक्षा सर्वांच्या आणखी जवळ आला आहे असंच वाटू लागलंय नाही का? 

चांद्रयान मोहिमेविषयी थोडं… 

चांद्रयान 3कडून भारतीय अंतराळ संशोधन विश्वाच्या बऱ्याच अपेक्षा आहेत. ISRO च्या माहितीनुसार चांद्रयान 1 च्या मोहिमेदरम्यान या उपग्रहानं चंद्राच्या चारही बाजुंनी 3400 हून जास्त परिक्रमा घातल्या होत्या. पण, 29 ऑगस्ट 2009 ला यानाचा संपर्क तुटला आणि मोहिम अपयशी ठरली. सध्याच्या मोहिमेबाबत मात्र सध्यापर्यंततरी कोणताही चुकिचा प्रकार घडलेला नाही. परिणामी ही मोहिम यशस्वी होण्यापासून काहीच पावलं दूर आहे. 

असं म्हणतात की चंद्राच्या माध्यमातून पृथ्वीबाबतच्या अनेक रहस्यांचा उलगडा होणार आहे. यातूनच चंद्रावरील जीवसृष्टीसंदर्भातील बऱ्याच गोष्टीही समोर येणार आहेत. शिवाय सौरमालेतील इतरही अनेक गोष्टी चांद्रयान मोहिमेच्या यशामुळं जगासमोर येतील. ज्यामुळं ही एक ऐतिहासिक मोहिम ठरत आहे. चांद्रयान 3 चंद्रावर यशस्वीपणे उतरल्यास,  रशिया, अमेरिका आणि चीननंतर हे यश संपादन करणारा भारत जगातील चौथा देश ठरणार आहे. 

Related posts