Magh Purnima 2024 : 13 वर्षांनंतर माघ पौर्णिमेला धनशक्ती, महालक्ष्मी आणि रुचक योग! ‘या’ राशींवर बरसणार माता लक्ष्मीची कृपा

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Magh Purnima 2024 : हिंदू पंचांगानुसार माघ शुक्ल पक्षाची पौर्णिमा तिथी ही 23 फेब्रुवारी दुपारी 3.33 वाजेपासून सुरुवात झाली आहे. उदय तिथीनुसार 24 फेब्रुवारीला माघ पौर्णिमा पाळली जाणार आहे. तब्बल 13 वर्षांनंतर माघ पौर्णिमेला महालक्ष्मी आणि रुचक योग जुळून आला आहे. तर मंगळ आणि शुक्र मकर राशीत असल्यामुळे दोन्ही ग्रहांच्या संयोगामुळे धनशक्ती योग निर्माण झाला आहे. हा योग तब्बल 5 वर्षांनी आला आहे. तर कुंभ राशीत सूर्य आणि बुध यांच्या संयोगामुळे बुधादित्य योग तयार होत असून शनि मूळ त्रिकोण राशीत असल्यामुळे शशा राजयोग माघ पौर्णिमेला आहे. याचा फायदा काही राशींच्या लोकांना होणार आहे. (Magh Purnima 2024 After 13 Years dhan shakti budhaditya yoga Mahalakshmi yoga and Ruchaka Yoga Mata Lakshmi grace will shower on these zodiac signs Astrology)

‘या’ राशींना होणार माघ पौर्णिमेचा फायदा !

मेष रास  (Aries Zodiac)  

या राशीमध्ये दहाव्या घरात धनशक्ती योग, अकराव्या घरात बुधादित्यासोबत शश योग जुळून येणार आहे. यामुळे मेष राशीच्या लोकांना अपार संपत्तीत वाढ होणार असून तुमच्या आदरात वाढ होणार आहे. तुमचं करिअरमध्ये पूर्ण लक्ष असणार आहे. नवीन नोकरीच्या संधीही मिळणार आहेत. याशिवाय सध्याच्या कंपनीतील तुमचं काम पाहता तुम्हाला प्रमोशनसह काही मोठी जबाबदारी मिळणार आहे. तुम्हाला शैक्षणिक क्षेत्रातही खूप फायदा मिळणार आहे. 

मिथुन रास (Gemini Zodiac)

माघ पौर्णिमा मिथुन राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घेऊन येणार आहे. मिथुन राशीच्या लोकांचे जीवन आनंदाने परीपूर्ण असणार आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ व्यतित करणार आहे. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी पद आणि प्रतिष्ठा मिळणार आहे.

कन्या रास (Virgo Zodiac)    

या राशीच्या लोकांनाही माघ पौर्णिमेच्या दिवशी तयार होणाऱ्या राजयोगाचा खूप लाभदायक ठरणार आहे. अध्यात्माकडे तुमचा कल वाढणार आहे. आयुष्यात सुख समृद्धी नांदणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होणार आहे. जीवनात सुख-समृद्धी वाढ होणार असून तुमच्या कामाचं कौतुक होणार आहे.  देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव बरसणार आहे.

सिंह रास (Leo Zodiac) 

माघ पौर्णिमेच्या दिवशी या राशीत चंद्राचे भ्रमण होणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना खूप फायदा होईल. धन शक्ती योग तयार झाल्यामुळे सिंह राशीच्या लोकांना धन-समृद्धी वाढ होणार आहे. करिअर आणि शैक्षणिक क्षेत्रात तुम्हाला खूप फायदा मिळणार आहे. आरोग्यही चांगले परिणाम दिसणार आहे. तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर तुम्हाला मोठा सौदा किंवा वडिलोपार्जित संपत्ती मिळणार आहे. 

तूळ रास (Libra Zodiac)  

तूळ राशीच्या लोकांसाठीही माघ पौर्णिमा खूप लाभदायक ठरणार आहे. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाचा वर्षाव होणार आहे. या वेळी तुम्हाला नोकरीशी संबंधित काही चांगली बातमी मिळणार आहे. 

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

 

Related posts