loksabha 2024 congress announces 43 candidates second list of election

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Loksabha 2024 : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून येत्या काही दिवसात लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. भाजप (BJP) आणि काँग्रेसने (Congress) आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. आता काँग्रेसने 43 उमेदवारांच्या दुसऱ्या यादीची (Congress Candidate Second List) घोषणा केली आहे. यात खुल्या वर्गात 7, 13 ओबीसी आणि 10 एसटी उमेदवारांना काँग्रसेने तिकिट दिलं आहे. छिंदवाडा लोकसभा मतदारसंघातून कमलनाथ यांचे पूत्र नकुलनाथला तिकिट देण्यात आलं आहे. तर भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या राहुल कस्वां यांना चूरु लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. 

याशिवाय या यादीत जोरहाटमधून गौरव गोगोई, सिलचरमधून सुरज्या खान, जालोरमधून अशोक गेहलोत यांचे पूत्र वैभव गेहलोत यांनी तिकिट देण्यात आलंय. याआधी काँग्रेसने पहिल्या यादीत 39 उमेदारांच्या नावाची घोषणा केली होती. 

मध्येप्रदेशमध्ये काँग्रेस उमेदवार

छिंदवाड़ा- नकुलनाथ 
भिंड- फूल सिंह बरैया
टीकमगढ – पंकज अहिरवार
सतना- सिद्धार्थ कुशवाहा
सीधी- कमलेश्वर पटेल
मंडला – ओंकार सिंह मरकाम
देवास – राजेंद्र मालवीय
धार – राधेश्याम मुवेल
खरगोन – पोरलाल खरते
बैतूल – रामू टेकाम

गुजरातमधून सात उमेदावारांची घोषणा

कच्छ बैठक- नीतीश लालन
बनासकांठा- गेनीबेन ठाकोर (आमदार) 
पोरबंदर- ललित वसोया (माजी आमदार) 
अहमदाबाद पूर्व- रोहन गुप्ता (प्रवक्ता) 
अहमदाबाद पश्चिम- भरत मकवाना
बारडोली- सिद्धार्थ चौधरी
वलसाड- अनंत पटेल (आमदार)

पहिल्या यादीत 39 उमेदार
काँग्रेसने जाहीर केलेल्या 39 उमेदवारांच्या पहिल्या यादीत राहुल गांधी, शशी थरुर आणि केसी वेणुगोपाल यांच्यासह दिग्गज नेत्यांच्या नावाचा समावेश होता. 

Related posts