international global maharashtra bmm convetion 2024 in california

( प्रगत भारत । pragatbharat.com)

BMM Convention 2024 : BMM म्हणजे बृहन महाराष्ट्र मंडळ. ही अमेरिकेतील 1981 पासून कार्यरत असलेली संस्था आहे. बृहन महाराष्ट्र मंडळ वेगवेगळ्या 52 महाराष्ट्र मंडळांना एकत्र आणून अमेरिकेतल्या  मातीत मराठी संस्कृतीचे संवर्धन करण्याचे आणि मराठी समाजाच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन विविध क्षेत्रातले प्रकल्प राबवते. याच BMM चा एक भाग असतो द्विवार्षीक अधिवेशन. यावेळेस 27  ते 30 जून 2024 या दरम्यान BMMचे अधिवेशन सॅन होजे कॅलिफोर्निया (Silicon Valley) येथे होणार आहे. या अधिवेशनास 6000 मराठी लोकांची उपस्थिती अपेक्षित आहे.

चार दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात सर्व वयोगटाकरता आणि वेगवेगळ्या विषयांवरचे (सांस्कृतिक वैचारिक आध्यात्मिक व्यावसायिक) असे 40 हून जास्त कार्यक्रम होणार आहेत.

कार्यक्रमाला दिग्गजांची उपस्थिती
महाराष्ट्रातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे, सुनील गावस्कर, गौर गोपाल दास, गोविंदगिरी महाराज, अच्युत पालव यासारख्या अनेक मान्यवर  अधिवेशनात सहभागी होण्यासाठी येत आहेत. तसेच महेश काळे,राहुल देशपांडे, प्रियंका बर्वे, संजीव अभ्यंकर,अश्विनी भिडे,कौशल इनामदार यासारखे संगीत क्षेत्रातले दिग्गज खास या अधिवेशनासाठी येत आहेत. 

कवितांचे अभिवाचन आणि नाटक याचा उत्तम संयोग असलेला ‘प्रिय भाई, एक कविता हवी आहे’ हा कार्यक्रम सादर होणार आहे आणि सध्या तरुणाईने डोक्यावर घेतलेला ‘भाडीपा – जगात भारी’ हा standup comedy show देखील सादर होणार आहे. जोडीला अजय अतुल यांचा गाण्याच्या लोकप्रिय कार्यक्रमांची मेजवाणी मिळणार आहे. अमेरिकेतील मराठी कलावंत आणि मराठी मंडळानी देखील या कार्यक्रमाची जय्यत तयारी केली आहे. नवरसांचा आविष्कार दाखवणारा उद्घाटन सोहळा, अमेरिकेतल्या विषयावरची नावीन्यपूर्ण नाटके,  कथाकथन,संगीत-नृत्याचे कार्यक्रम तसेच ढोल ताशा,  एकांकिका आणि संगीत, नृत्य यांच्या स्पर्धा सादर केल्या जाणार आहेत. 

धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांमध्ये गुरुजनांचे विचार, संत परंपरेची ओळख, कीर्तन, वारी, ज्योतिष,हीलिंग वर्कशॉप  यासारखे कार्यक्रम असतील. इतिहास, मेडीसीन, उद्योगअशा विषयावरील विविध चर्चासत्रे, कार्यशाळा आणि परिसंवाद आयोजित करण्यात आले आहेत. इथे वाढलेल्या तरुण पिढीकरता करियर मार्गदर्शन, Shark Tank, Speed Dating, वधू-वर मेळावा, Fashion Show आणि नवीन विचारांना चालना देणारेअसे खास कार्यक्रम आयोजित केले आहेत.

या अधिवेशनाच्या तयारी साठी गेली दोन वर्षे 350 स्वयंसेवक आणि 30 समित्यांच्या माध्यमातून तयारी करत आहेत. या अधिवेशनांचे महत्वाचे आकर्षण म्हणजे अस्सल मराठी जेवण! सुग्रास मराठी खाद्यपदार्थांची रेलचेल अनुभवायला मिळणार आहे. संपूर्ण जागा अनेकविध थीमने सजवली जाणार आहे क्षणात कर्मभूमी तर तर क्षणात  मायभूमी पाहायला मिळेल. आहे, प्रदर्शने आहेत, फोटो स्पॉट्स आहेत, फॅशन शो आहे.  शिवाय अनेक शास्त्रज्ञ, संशोधक, वेगवेगळ्या विषयातील तज्ञ लेखक उद्योग क्षेत्रातील, मनोरंजन क्षेत्रातील अग्रणी मान्यवर येत आहेत. 

वेब साइट – BMM2024.ORG 

Related posts