आईस्क्रीम विक्रेत्याचं किळसवाणं कृत्य; हस्तमैथून केल्यानंतर तेच वीर्य….; VIDEO व्हायरल

( प्रगत भारत । pragatbharat.com)

अनेकदा भूक लागली की आपण सर्रासपणे मित्रांसह, कुटुंबासह उघड्यावर मिळणारे पदार्थ खातो. हे पदार्थ खाताना आरोग्याचा फारसा विचार केला जात नाही. हे पदार्थ कशाप्रकारे बनवले जातात हे पाहिलं तर अनेकजण ते कायमचं खाणं सोडून देतील. रस्त्यावरील विक्रेत्यांचे यासंबंधी अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलही झाले आहेत. पण त्यावर उमटणाऱ्या प्रतिक्रियाही तात्पुरत्या असतात. काही दिवसांनी पुन्हा एकदा लोक रस्त्यांवरील स्टॉलकडे वळतात. दरम्यान आता असाच एक किळसवाणा व्हिडीओ समोर आला आहे. 

तेलंगणामध्ये रस्त्यावरील एका विक्रेत्याने हस्तमैथून करत तेच वीर्य आईस्क्रीममध्ये मिसळल्याचा संतापजनक आणि किळसवाणा प्रकार समोर आला आहे. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाल्याने उघड झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. 

वारंगल जिल्ह्यात ही घटना घडली आहे. कालूराम असं या आईस्क्रीम विक्रेत्याचं नाव आहे. नेक्कोंदा येथे तो आईस्क्रीम विकत असताना हे गैरकृत्य कॅमेऱ्यात कैद झालं. कालूराम मूळचा राजस्थानचा रहिवासी आहे. 

पोलिसांनी या प्रकरणी तपास करताना कालूरामला ताब्यात घेतलं आहे. आंबेडकर सेंटर येथे हा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

व्हिडिओनंतर व्यक्त होणारा संताप लक्षात घेता अन्न निरीक्षकाने नमुने गोळा केले आणि सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य केल्याबद्दल भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 294 नुसार कालूरामविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 

हा व्हिडीओ सोशल मीडियायवर व्हायरल झाल्यानंतर नेटकरी संताप व्यक्त करत असून, त्याच्या कृत्यामागे नेमकं कारण काय अशी विचारणा करत आहेत. “माझा एकच प्रश्न आहे की का? ग्राहकांचा तिरस्कार किंवा आणखी काही. कठोर शिक्षा देण्यापूर्वी न्यायाधीशांनी त्याला कारण विचारायला हवं. ही अन्न भेसळ कल्पनेच्या पलीकडे आहे,” असं एका युजरने म्हटलं आहे. तर एकाने म्हटलं आहे की, “काही वर्षांपूर्वी ऐकलं होतं की पाणीपुरी विक्रेत्याने मलमूत्र मिसळलं होतं. माझा कधीच विश्वास बसला नाही पण असे काही बघून माझ्याकडे शब्दच नाहीत.”

Related posts