रशियातील म्युझिक कॉन्सर्टमध्ये दहशतवाद्यांचा अंदाधूंद गोळीबार; 60 ठार, 145 हून अधिक जखमी

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Russia News : दहशतवादी हल्ल्यानं रशियाची राजधानी मॉस्को हादरलीये. मॉस्कोतील क्रोकस सिटी हॉलमध्ये एका संगीत मैफिलीदरम्यान लष्करी गणवेश घातलेल्या बंदूकधाऱ्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात 60 पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला तर 145 हून अधिक जण जखमी झालेत. जेव्हा क्रोकस हॉलमध्ये हा हल्ला झाला तेव्हा प्रसिद्ध सोव्हिएत रॉक बँड ‘पिकनिक’चा कॉन्सर्ट सुरूचा मैफिल रंगली होती. (Terrorist attack in the capital of Russia Moscow in moscows concert hall america had given warning)

रशियन सरकारची वृत्तसंस्था असलेल्या आरआयए नोवोस्तीने या हल्ल्याबद्दल अधिक माहिती दिलीय. या हल्लेनंतर रशियन सैन्यानं घटनास्थळाचा ताबा घेतला आणि एका दहशतवाद्याला पकडण्यात त्यांना यश मिळालं ISIS या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी घेतलीय. या हल्ल्यानंतर मॉस्कोमध्ये हाय अलर्ट घोषित करण्यात आलाय. रेल्वे आणि विमानसेवा बंद करण्यात आली आहे. यासोबतच शहरातील सर्व शॉपिंग मॉल्स बंद राहणार असून नागरिकांना एकत्र येण्यास बंदी घलण्यात आली आहे. दरम्यान या हल्ल्यानंतर रशियानं ISIS वर कठोर कारवाईचा इशारा दिलाय. 

दरम्यान महत्त्वाचं म्हणजे मॉस्कोमधील अमेरिकन दूतावासाने 15 दिवसांपूर्वी मॉस्कोला अलर्ट केलं होतं. त्यांच्याकडून 7 मार्चला एक ॲडव्हायजरी जारी करण्यात आली होती. ज्यामध्ये त्यांनी हल्ल्याची शक्यता वर्तविली होती. या ॲडव्हायजरीनुसार दहशतवादी मॉस्कोमधील मोठ्या संमेलनांमध्ये हल्ला करु शकतात. यानंतर यूएस दूतावासाने मॉस्कोमध्ये राहणाऱ्या नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी किंवा मोठ्या संख्येने होणाऱ्या कार्यक्रमाला जाऊ नका असा सल्ला दिला होता. या सल्ल्यानंतर अवघ्या 15 दिवसात मॉस्कोमध्ये एका संगीत कार्यक्रमादरम्यान सर्वात मोठा दहशवादी हल्ला झाला आणि मॉस्को हादरलं. 


मात्र, दुसरीकडे मॉस्कोच्या क्रोकस सिटी हॉलवरील हल्ल्याबाबत अमेरिकेला कोणतीही गुप्तचर माहिती दिली नव्हती असा आरोप व्हाईट हाऊसचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन किर्बी यांनी केला आहे. तर या हल्ल्यानंतर जारी करण्यात आलेल्या आणखी एका निवेदनात अमेरिकेने युक्रेनला क्लीन चिट दिल्याचं समोर आलंय. व्हाईट हाऊसकडून जारी करण्यात आलंय की, ‘मॉस्कोमधील दहशतवादी हल्ल्यात युक्रेन किंवा युक्रेनियन लोकांचा सहभाग असल्याचे कोणतेही संकेत त्यांना मिळालेलं नाहीत’. 

एपीच्या वृत्तानुसार, स्फोटानंतर लागलेल्या आगीमुळे, कॉन्सर्ट हॉलचा बराचसा भाग आगीच्या भक्ष्यस्थानी होता. एवढंच नाही तर या हॉलचे छत अंशतः कोसळलय. दरम्यान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्या सल्लागाराने ट्विटरवर एका पोस्टमध्ये या हल्ल्यात युक्रेनियनचा सहभाग नाकारलाय. 

Related posts