Telangana Hyderabad Kurungati Apsara Murder victim accused of abetting first husband Suicide; पहिल्या नवऱ्याला कर्जात बुडवलं, त्याने जीव देताच मामाला पटवला, मयत अप्सराची कुंडली समोर

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

हैदराबाद : तेलंगणातील कुरुंगती अप्सरा हत्या प्रकरणात नवनवीन माहिती समोर येत आहे. आरोपी पुजाऱ्याचे आपल्याच भाचीशी अनैतिक संबंध होते. तिने लग्नासाठी तगादा लावल्याने मामाने दगडाने ठेचून तिची हत्या केल्याचा आरोप आहे. मात्र अप्सराचं आधी एक लग्न झालं होतं, तिच्या पहिल्या नवऱ्याने आत्महत्या केली. अन् त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा अप्सरा आणि तिच्या आईवर आरोप होता.

तेलंगणातील हैदराबादमध्ये ५ जून रोजी एक पुजारी राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलीस ठाण्यात पोहोचला. त्याने आपलं नाव अयागरी साईकृष्ण असल्याचं सांगितलं. त्याने आपली भाची कुरुंगती अप्सरा हरवल्याची तक्रार तिथे दिली. तीन जूनला मी तिला शम्साबाद परिसरात ड्रॉप केलं. तिथून ती भद्राचलम येथे मित्रांकडे जाणार होती, मात्र ना ती तिथे पोहोचली, ना हैदराबादला गेली, असं त्याचं म्हणणं होतं.

३६ वर्षीय अयागरी साईकृष्ण हैदराबाद येथील सरुरनगर भागात पुजारी आहे. त्यानेच भाचीला अखेरचं पाहिलं असल्यामुळे पोलिसांनी त्याची चौकशी सुरु केली. आपण अप्सराला तिच्या घराजवळून पिकअप केलं. शम्साबादला ड्रॉप केलं, मात्र चार जूनपासून तिचा फोन स्विच्ड ऑफ येतोय. मी तिच्या आईसोबत तिचा शोध सुरु केला, मात्र ती कुठेच सापडली नाही, असा दावा साईकृष्णने पोलीस चौकशीत केला.

अप्सरा कोण होती?

३३ वर्षीय अप्सराचा पहिला विवाह कार्तिक राजा नावाच्या सॉफ्टवेअर इंजिनिअरसोबत झाला होता. अप्सरा आणि तिची आई अरुणाला आलिशान आयुष्य जगायचं होतं. त्यासाठी त्या कार्तिकला फाईव्ह स्टार हॉटेल, महागडे कपडे-दागिने घ्यायला भाग पाडत होत्या. अप्सराची बिलं भरण्यासाठी कार्तिकवर २५ लाखांचं कर्ज काढण्याची वेळ आली.

हनिमूनलाच आक्रित, बायकोसमोर नवरा बुडाला, मदतीऐवजी तरुणांचा मौल्यवान वस्तूंवर डल्ला
मायलेकीने कार्तिकवर हुंड्यासाठी छळ आणि घरगुती हिंसाचाराचे आरोप करत तक्रार दाखल केली. त्यामुळे कार्तिकला १५ दिवसांचा तुरुंगवासही भोगावा लागला. त्यानंतर कार्तिकने आत्महत्या केली. या घटनेनंतर अप्सरा आणि अरुणा लो-प्रोफाईल आयुष्य जगू लागल्या. कार्तिकच्या कुटुंबीयांच्या नजरेत येऊ नये म्हणून लपून राहू लागल्या. मात्र आता बातम्यांमध्ये अप्सराच्या हत्येचे प्रकरण पाहून कार्तिकच्या आईने पोलिसात धाव घेतली.

अप्सरा हत्येचा उलगडा

दरम्यान, अप्सराच्या हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी सरुरनगर ते शम्साबाद भागातील २१ किलोमीटर मार्गावरील सीसीटीव्ही फूटेज तपासण्यास सुरुवात केली. तिथेच पोलिसांना पहिला क्लू सापडला. साईकृष्ण अप्सराला तिच्या घराजवळून पिकअप करताना तर कॅमेरात कैद झाला, मात्र तिला शम्साबादला ड्रॉप केल्याचं कुठेच दिसलं नाही. त्यामुळे पोलिसांनी त्याची कसून चौकशी करण्यास सुरुवात केली, तेव्हा तो उडवाउडवी करु लागला आणि सारखा आपला जबाब बदलू लागला.

विधवा महिलेच्या हत्येचं गूढ उकललं, पोटच्या पोरानेच आईचा जीव घेतला, कारण फक्त…
पोलिसांनी हिसका दाखवताच साईकृष्ण घडाघडा बोलू लागला. आपणच अप्सराचा खून केल्याची कबुली त्याने दिली. तिच्या हत्येचं कारण, पद्धत ऐकून पोलीसही चपापले.

प्रेमात अडथळा, आईसोबत सतत भांडण; मुलीनं आई अन् प्रियकराच्या मदतीने वडिलांचा काटा काढला

साईकृष्णा विवाहित असून दोन मुलांचा बाप आहे. तो आपल्या भाचीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. आणि आता भाची आपल्या नात्याला नाव देण्यासाठी तगादा लावत होती. बायको-मुलांना सोडून आपल्यासोबत राहावं यासाठी ती मागे लागली होती. या मुद्द्यावरुन दोघांमध्ये रोज भांडणं व्हायची. नेहमीच्या कटकटीला कंटाळून साईने अप्सराचा काटा काढण्याचा निर्णय घेतला.

लग्न ठरलेल्या जोडप्यावर काळाचा घाला, बाथरुममध्ये आंघोळ करतानाच मृत्यूने गाठलं
साईने अप्सराला समजवण्याचा शेवटचा प्रयत्न केला, मात्र ती ऐकायला तयार नव्हती. शेवटी त्याने दगडाने ठेचून तिची हत्या केली. तिचा मृतदेह कारच्या डिकीत ठेवला. मंदिराच्या मागे असलेल्या मंडल महसूल अधिकाऱ्याच्या कार्यालयाजवळ मेनहोलमध्ये तिचा मृतदेह टाकला. त्यानंतर त्यावर दोन ट्रक भरुन माती टाकली. तरीही मृतदेहाची दुर्गंधी सुटल्याने त्याने मेनहोलचे झाकण सिमेंटने सील केले. स्वतःच ती हरवल्याची तक्रार करण्यासाठी पोलिसात गेला मात्र आपल्याच जबाबात गुरफटून त्याची पोलखोल झाली.

[ad_2]

Related posts