[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Kashedi Ghat: मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa Highway News) सर्वात धोकादायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कशेडी घाटातून प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कशेडी बोगद्याचे (Kashedi Ghat) काम पूर्ण झाले असून लवकरच कशेडी बोगद्याची एक मार्गिका या महिनाअखेर वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार आहे. त्यामुळे खेड तालुक्यातील कशेडी घाट ते रायगड जिल्ह्यातील पोलादपूर हे अंतर अवघ्या 10 मिनिटात पार करता येणार आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करतांना पावसाळ्यात नेहमीच कशेडी घाटातून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. येथील वळणावळणाचा घाट आणि महामार्गावर दरड माती खाली येणे या घटना पावसाळ्यात घडत असतात त्यामुळे अपघातही होतात. यासाठी पर्यायी मार्ग म्हणून कशेडी घाटातून गेली दोन वर्ष बोगद्याचे काम सुरु होते. त्यापैकी एका बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. काही दिवसांपूर्वी राज्याचे बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी या कामाची पाहणी देखील केली होती. कशेडी बोगद्याची एक मार्गीका या महिनाअखेर खुली करण्यात येणार आहे. त्यामुळे खेड तालुक्यातील कशेडी घाट ते रायगड जिल्ह्यातील पोलादपूर हे अंतर अवघ्या 10 मिनिटांत पार होणार आहे.
सिंधुदुर्गात जाणा-या चाकरमान्यांसाठी इंटरव्हल
मुंबई-गोवा महामार्गावरील सर्वात धोकादायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कशेडी घाटात नेहमीच अपघात होत असतात. मुंबई गोवा महामार्गानं सिंधुदुर्गात जातान कशेडी घाट हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो. सिंधुदुर्गात जाणा-या चाकरमान्यांसाठी हा इंटरव्हल आहे. कारण पनवेल पासून 150 किमीचा टप्पा या घाटात पूर्ण होतो. हा घाट उतरलो की, रत्नागिरी जिल्हा सुरू होतो. नागमोडी वळणांचा डोंगराळ भाग आणि त्यातून चौपदरी महामार्ग उभारताना बरीच आव्हानं होती. ती पार करत या बोगद्याचे काम जवळपास पूर्ण झाल्यात जमा आहे. या घाटात थांबून रवींद्र चव्हाण यांनी अखेरच्या टप्यात सुरू असलेल्या कामाची पाहणी देखील केली.
जड वाहनांसाठी जवळपास 40 मिनिटांचा कालावधी
नव्या बोगद्यामुळे कशेडी घाट ते रायगड जिल्ह्यातील पोलादपूर हे अंतर अवघ्या दहा मिनिटांत पार होणार आहे. हे अंतर पार करण्यासाठी अवघड वळणांमुळे जवळपास 20 ते 25 मिनिटांचा कालावधी लागतो. तर जड वाहनांसाठी जवळपास 40 मिनिटांचा कालावधी लागतो. अवघड वळण घाटातून आहेत त्यामुळे अनेकदा अपघातांचेही प्रसंग ओढवतात पण या सगळ्याला आता उत्तम पर्याय वाहतुकीसाठी उपलब्ध होणार आहे.
हे ही वाचा :
Mumbai Goa Parshuram Ghat: मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट उद्यापासून 24 तास वाहतुकीसाठी खुला, पण पावसाळ्यात हाल?
[ad_2]