Cancer April 2024 Horoscope : एप्रिल महिन्यात नशिब साथ देणार पण नियमाचं उल्लंघन करु नका!

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Cancer Monthly Horoscope April 2024 in Marathi : एप्रिल महिन्यात अनेक ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. ग्रहांच्या या स्थितीबदलामुळे कर्क राशीच्या आयुष्यात, करिअर, नातेसंबंध यावर काय परिणाम होणार याबद्दल टॅरो कार्ड तज्ज्ञ डॉ. कविता ओझा यांनी सांगितलंय. (Cancer April 2024 Horoscope kark Rashi Bhavishya For April Monthly Rashifal in Marathi)

कर्क राशीसाठी कसा असेल एप्रिल महिना?

टॅरो कार्ड तज्ज्ञ डॉ. कविता ओझा यांनी एप्रिल महिना हा कर्क राशीसाठी कसा असेल हे सांगितलं आहे. त्या म्हणतात की, कर्क राशीच्या लोकांसाठी एप्रिल महिना अनेक संधी घेऊन आला आहे. त्यांचं नशिब त्यांची साथ देणार आहे. नवीन सुरुवात, या महिन्यात वरिष्ठ सहकार्य किंवा बॉसकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य लाभणार आहे. पूर्ण विश्वासासोबत आयुष्याची वाटचाल करा. आयुष्यात काही ठिकाणी रिक्स घ्या आणि आव्हान पत्करा. पण या काळात कुठल्याही प्रकारेच्या नियमाचे उल्लंघन करु नका. परंपरेला धरुन काम करा. 

करिअरच्या दृष्टीकोनातून या महिन्यात तुम्हाला मोठी संधी मिळणार आहे. नवीन नोकरी, प्रमोशन होऊ शकतं. तुमच्यामधील कल्पनाशक्तीचा उपयोग करता येईल असा प्रकल्प तुम्हाला मिळणार आहे. तुमचं स्वत:चं व्यवसाय सुरु करु शकता पण याबद्दल गुप्तता बाळगा. आयडिया आणि विचार कोणासोबतही शेअर करु नका. 

नवीन व्यक्तीची एन्ट्री तुमच्या आयुष्यात होऊ शकते. शुभ कार्य किंवा नातेसंबंधात तुम्ही अडकू शकता. प्रिय व्यक्तीच पूर्ण सहकार्य मिळणार आहे. मात्र तुमच्या नातेसंबंधाबद्दल केअरफ्री वृत्त ठेवणं योग्य नाही. 
एप्रिल महिन्यात तुम्ही कुठल्या तरी साहसी सहलीवर जाऊ शकता. मात्र सतर्क राहा कारण तुम्हाला दुखापत होऊ शकते. 

आर्थिकदृष्ट्या एप्रिल महिना चांगला असणार आहे. आर्थिक स्थिती स्थिर राहिल आणि कुठूनही तुम्हाला पैसा मिळणार आहे. पैशाला तुम्ही तुमच्या कामात किंवा शिक्षणासाठी खर्च करा. पॉवरफूल व्यक्तीच सहकार्य मिळणार आहे. 

कर्क राशीच्या लोकांनी एप्रिलमध्ये करा हे उपाय !

एप्रिल महिन्यात कर्क राशीच्या लोकांनी गुप्त दान नक्की करावं. 

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

 

Related posts