Wrestlers Protest Sakshi Malik On Chargesheet Filed Against Brij Bhushan Sharan Singh Anurag Thakur Delhi Police

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Sakshi Malik On Wrestlers Protest: दिल्ली पोलिसांनी गुरुवारी (15 जून) भारतीय कुस्ती महासंघाचे निवर्तमान अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh)  यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं आहे. क्रीडामंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांच्या आश्वासनानंतर कुस्तीपटूंनी 15 जूनपर्यंत आंदोलन स्थगित केलं होतं. अनुराग ठाकूर यांनी 15 जूनपर्यंत बृजभूषण यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलं जाईल, असं आश्वासन कुस्तीपटूंना दिलं होतं. आता याप्रकरणी ऑलिम्पिक पदक विजेत्या साक्षी मलिकनं (Sakshi Malik) मोठं वक्तव्य केलं आहे.

साक्षी मलिक म्हणाली की, आम्ही पुढचं पाऊल तेव्हाच टाकू, जेव्हा आम्हाला दिलेली आश्वासनं पूर्ण होत आहेत की नाही त्याबाबत आम्हाला स्पष्टता मिळेल. साक्षीनं एएनआयसोबत बोलताना सांगितलं की, दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात स्पष्ट नमूद केलं आहे की, ते (बृजभूषण सिंह) दोषी आहेत. आमच्या वकिलानं एक अर्ज दाखल केला आहे, जेणेकरून ते लवकरात लवकर आरोपपत्र पाहून आरोपांचा तपास करू शकतील. 

कुस्तीपटूंचं पुढचं पाऊल  काय?

क्रीडामंत्र्यांकडून देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता होते की नाही? यावर कुस्तीपटूंची पुढची दिशा ठरणार आहे. सर्व परिस्थिती पाऊन त्यानंतरच पुढचं पाऊल टाकू, असं साक्षी मलिकनं माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी बृजभूषण यांच्याविरोधात सहा महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ आणि पाठलाग केल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे. 

दिल्ली पोलिसांचं म्हणणं काय?

पोलिसांनी अल्पवयीन कुस्तीपटूंच्या वतीनं बृजभूषण यांच्याविरोधात दाखल केलेली तक्रार रद्द करण्याची शिफारस करताना, कोणतेही ठोस पुरावे सापडलं नसल्याचं आरोपपत्रात सांगितलं आहे. अल्पवयीन कुस्तीपटूनं यापूर्वी बृजभूषण यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता, परंतु नंतर तो मागे घेतला. सुमारे 1500 पानांच्या आरोपपत्रात सहाही महिला कुस्तीपटूंचे तपशीलवार जबाब पुराव्यासह पोलिसांनी नमूद केलेले आहेत.

काय आहे आरोपपत्रात?

कुस्तीपटूंच्या वतीनं बृजभूषण सिंह यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांमध्ये पोलिसांनी आयपीसीच्या कलम 354, 354 ए आणि 354 डी, 506 भाग-1 अंतर्गत आरोपपत्र दाखल केलं आहे. त्याचबरोबर कुस्ती महासंघाचे माजी सहाय्यक सचिव विनोद तोमर यांच्याविरुद्ध कलम 109, 354, 354A, 506 अंतर्गत आरोपपत्रही दाखल करण्यात आलं आहे. यासोबतच पोलिसांनी पेन ड्राईव्हमध्ये डिजिटल पुरावेही न्यायालयात दाखल केले आहेत.

दिल्ली पोलिसांनी आरोपपत्र दाखल केल्यानंतर लगेचच, कुस्तीपटूंनी पुढील कारवाईबद्दल बोलण्यास सुरुवात केली, परंतु दिल्ली पोलिसांनी फारसं काही सांगितलं नाही. विशेष म्हणजे, देशातील प्रसिद्ध कुस्तीपटू बृजभूषण शरण सिंह यांच्या अटकेच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत.

[ad_2]

Related posts