Guru Chandal Rajyog : गुरु-राहूचा मेष राशीत प्रवेश !’या’ 3 राशींच्या आयुष्यात 30 ऑक्टोबरपर्यंत भूकंप

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Effect of Guru Chandal Rajyog on Zodiac Signs : आजचा दिवस वैदिक ज्योतिषशास्त्रासाठी खूप खास आहे. आज शनि वक्री स्थितीत जाणार आहे. तर राहू केतुही आपली चाल बदलणार आहे. वैदिक शास्त्रानुसार 9 ग्रह आणि नक्षत्र आपली स्थिती बदलतात तेव्हा मानवी आयुष्यावर त्याचे सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम दिसून येतात. देवांचे गुरु बृहस्पती आणि राहू यांची मेष राशीत भेट (Guru Rahu Yuti) झाली आहे. त्यामुळे एक खास योग जुळून आला आहे. गुरु चांडाळ राजयोग हा अतिशय दुर्मिळ योग असून या राजयोगामुळे 3 राशींच्या आयुष्यात खळबळ माजणार आहे.  30 ऑक्टोबरपर्यंत या राशीच्या लोकांना संकटांचा सामना करावा लागणार आहे. 

दरम्यान 30 ऑक्टोबरनंतर छाया ग्रह वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर या राजयोगातून राशींना मुक्ती मिळेल. पण या काही महिन्यात या राशींना करिअरमध्ये चढउतार आणि आर्थिक समस्यांचा सामना करावा लागणार आहे. (guru rahu yuti making guru chandal rajyog bad effect career money issue in Aries Gemini Sagittarius horoscope)

धनु (Sagittarius)

गुरु चांडाल योग या राशीच्या लोकांसाठी अतिशय अशुभ ठरणार आहे. 30 ऑक्टोबरपर्यंत या लोकांचं उत्पन्नापेक्षा जास्त खर्च होणार आहे. त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती ढासळणार आहे. मुलांसंबंधित घटनेने तणाव येण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांची प्रकृती खालावू शकते. वाहन चालवताना काळजी घ्या. 

उपाय – देवांचे ध्यान करा. त्याशिवाय पक्ष्यांना अन्न आणि पाणी दान करा. 

मिथुन (Gemini)

या राशीच्या लोकांसाठी गुरु चांडाळ राजयोग आर्थिक संकट घेऊन आला आहे. पुढली चार महिने या राशीच्या लोकांचे बँक बलेन्स खराब स्थितीत येणार आहे. या लोकांना कर्ज मागण्याची वेळ येऊ शकते. कोर्टात कुठलं प्रकरण सुरु असल्यास ते त्यांचा विरोधात लागण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात पण चढ उतार सहन करावे लागणार आहेत. 

उपाय – पीपळांचा झाडाजवळ रोज तुपाचा दिवा लावा. 

मेष (Aries)

या राशीच्या लोकांच्या आयुष्यात  गुरु चांडाळ राजयोग भूकंप येणार आहे. या लोकांना अनेक समस्यांच्या सामना करावा लागणार आहे. व्यवसायात तोटा तर करिअरमध्ये ब्रेक लागण्याची शक्यता आहे.  कामाच्या ठिकाणी वरिष्ठ असो किंवा सहकारी यांच्याशी तुमची वादावादी होणार आहे. जुन्या गुंतवणुकीतून आर्थिक फटका बसणार आहे. 

उपाय – दर शनिवारी हनुमानच्या मंदिरात जाऊन पूजा करा. 

( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

 

Related posts