Video : पोलीस ठाण्यासमोर महिलेने उडवले 500-500च्या नोटांचे बंडल; कारण ऐकून बसेल धक्का

( प्रगत भारत । pragatbharat.com)

MP News : मध्य प्रदेशात (MP News) गुरुवारी संध्याकाळी नोटांचा पाऊस पडल्याचे पाहायला मिळाले. पोलीस ठाण्यासमोरील (MP Police) रस्त्यावरच एका महिलेने 500 च्या नोटांचा वर्षाव केला. या नोटांच्या पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांनी बऱ्याच प्रयत्नांनी पोलीस ठाण्यासमोरून लोकांना हटवले. त्यानंतर महिलेकडे चौकशी केली असता तिने पोलिसांवरच भ्रष्टाचाराचा (Bribe) आरोप लावला. पोलीस ठाण्याच्या बाहेरील रस्त्यावरच वृद्ध महिलेने अचानक तिच्या पर्समधून नोटांचे बंडल काढले आणि आधी 500-500 च्या नोटा उडवल्या. यानंतर पुन्हा 100-100 च्या नोटांचे बंडल काढून रस्त्यावर फेकले. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे.

वृद्ध महिलेच्या या कृतीने पोलीस ठाण्यासमोरील रस्त्यावर नोटा सर्वत्र पसरल्या होत्या. या घटनेनंतर वाहनचालकांची गर्दीही नियंत्रणाच्या बाहेर गेली. प्रवाशांनी रस्त्यावर थांबून हा सगळा काय प्रकार आहे याची माहिती घेण्यास सुरुवात केली. तर काही लोकांनी नोटा खिशात टाकण्या प्रयत्नही केला. पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी बाहेरील रस्त्यावर धाव घेतली आणि लोकांना बाजूला करण्यास सुरुवात केली.

यामागचे कारण ऐकून तुमचे रक्त उकळेल. या 50 वर्षीय महिलेचा आरोप आहे की, तिचा मुलगा तिच्यावर अत्याचार करतो. चार वर्षांपूर्वी त्यांनी मुलाविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. यावर कोणतीही कार्यवाही होत नाही. पोलिसांनी कारवाई करण्यास सांगितल्यास ती लाच मागते, असे महिलेने सांगितले. यामुळे महिलेने 500 च्या अनेक नोटा रस्त्यावर उडवून दिल्या.

मात्र या वृद्ध महिलेकडे असे करण्याबाबत चौकशी केली असता सर्वांनाच धक्का बसला. 50 वर्षीय महिलेचा आरोप आहे की, तिचा मुलगा मारहाण करतो. चार वर्षांपूर्वी मुलाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्याच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. पोलिसांना कारवाई करायला सांगितले की ते लाच मागतात. यामुळे महिलेने 500 च्या अनेक नोटा रस्त्यावर उडवल्या होत्या.

 

मध्य प्रदेशातील निमच येथील राजीव नगर परिसरात राहणाऱ्या 50 वर्षीय शांतीदेवी 15 जून रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास  स्कूटीने कॅन्ट पोलीस ठाण्यात पोहोचल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या हातात काठीही होती. काही वेळाने त्यांनी कॅन्ट पोलीस ठाण्यासमोरील रस्त्यावर 500-500 च्या नोटा उडवण्यास सुरुवात केली. शांतीदेवी यांनी त्यांच्या पर्समधून सुमारे 25 हजार रुपये काढून रस्त्यावर उडवूल्याचे सांगण्यात येत आहे. पाचशेच्या नोटा पाहून लोकांची रस्त्यावर गर्दी होई लागली. त्यामुळे पोलिसांना कारवाई करून जमाव हटवावा लागला.

पोलीस आपले ऐकत नसल्याचा आरोप शांती देवी यांनी केला आहे. कारवाई करण्यासाठी पोलीस लाच मागत असल्याचे शांतीदेवी यांनी म्हटलं आहे.  “पोलिसांना भ्रष्टाचार करायचा आहे. कोणी गरीब पोलिसांकडे आला तर त्याच्या खिशात 1000-5000 रुपये असायलाच हवा. जो गाडी घेऊन येतो त्याच्यासमोर पोलीस हात जोडतात. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं की मी एक हजार रुपयात खाते उघडत आहे. माझ्या बहिणींनो, मी तुम्हाला विनंती करते की, इतके सक्षम व्हा की आपण शिवराज सिंहाना कोटी रुपये देऊ शकू. महिलेमध्ये इतकं धैर्य आहे. शिवराज यांनी जे केलं ते चुकीचं आहे. तुम्ही पैशाने कोणालाही विकत घेऊ शकत नाही. तुम्ही सत्य दाबू शकत नाही. शिवराज असोत की मोदीजी, ते सत्य विकत घेऊ शकत नाहीत, असे शांतीदेवी यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं.

ही महिला एनसीसीची सेवानिवृत्त कर्मचारी असून तिचा मुलगा नृत्य शिक्षक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचे तिच्या मुलासोबत अनेकदा वाद होत होते. 6 महिन्यांपूर्वीही शांतीदेवी यांनी आपल्या मुलाने बँक खात्यातून पैसे काढल्याचा आरोप करत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. दुसरीकडे शांतीदेवी या दररोज कोणत्या ना कोणत्या विभागात जाऊन आपल्या समस्या सांगून तिथे गोंधळ घालत असतात असे म्हटलं जात आहे. काही वर्षांपूर्वी त्यांनी न्यायालयात एका महिला पोलिसावरही हात उचलला होता. 

Related posts