MP Crime Wife throws Boiling oil poured on husbands private part;मोबाईल हिसकावून घेतल्याने पत्नीला राग अनावर, नवऱ्याच्या प्रायव्हेट पार्टवर ओतले उकळते तेल

( प्रगत भारत । pragatbharat.com)

MP Crime: घरगुती हिंसाचाराच्या अनेक घटना मन हादरवून सोडतात. रागावर नियंत्रण नसेल तर आपण स्वत: सोबत आपल्या प्रियजनांचे नुकसान करतो, हे यातून दिसते. अनेक प्रकरणांमध्ये पत्नीने पत्नीवर अत्याचार केल्याचे प्रकार समोर येतात. पण मध्य प्रदेशमध्ये संतापलेल्या एका पत्नीने पतीचे आयुष्यभरासाठी नुकसान केले आहे. केवळ मोबाईल हिसकावून घेतल्याचे निमित्त ठरले. 

पत्नीच्या हातातून पतीने मोबाईल हिसकावून घेतला. ही नेहमीसारखी सर्वसाधारण गोष्ट समजून तो झोपी देखील गेला. पण इकडे पत्नीच्या मनात अपमानाच्या ज्वाळा भडकू लागल्या होता. प्रचंड राग तिला झोपू देत नव्हता. तिचा अस्वस्थपणा वाढू लागला होता. त्याच रागात रात्री पती झोपेत असताना पत्नीने गरम तेल आणून पतीच्या प्रायव्हेट पार्टवर ओतले. मध्य प्रदेशातील (मध्य प्रदेश) ग्वाल्हेरमध्ये ही घटना घडली. 

नवऱ्याचा वेदनेने ओरडण्याचा आवाज परिसरातील लोकांनी ऐकला. काही वेळातच घरात गर्दी जमा झाली. जमावाने पिडित पतीला रुग्णालयात दाखल केले. जिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. दुसरीकडे पतीच्या तक्रारीवरून कंपू पोलीस ठाण्यात पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर पत्नी फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत.

ग्वाल्हेर जिल्ह्यातील गिजोरा पोलीस स्टेशनच्या भागे गावात राहणारा 32 वर्षीय सुनील धाकड खाजगी नोकरी करतो. सुनील त्याची पत्नी भावनासोबत ग्वाल्हेरच्या महादजी नगरमध्ये राहतो. काही दिवसांपूर्वी शेजारी राहणाऱ्या एका महिलेने सुनीलकडे तिची तक्रार केली. तुम्ही घरी नसताना भावना माझ्या पतीशी बोलत असते असे तिने सुनीलला सांगितले.

सुनीलने पत्नी भावनाला अनेकदा समजावून सांगितले पण काहीही फरक पडला नव्हता. 6 जून रोजी रात्री पती सुनील घरी आला असता भावना तरुणाशी मोबाईलवर बोलत होती. भावनाने असे करु नये अशी त्याने वारंवार समज दिली.

मात्र तिने मोबाईलवर बोलणे थांबवले नाही. यामुळे संतापलेल्या सुनीलने भावनाचा मोबाईल हिसकावून घेतला. त्यावेळी भावना रागावून निघून गेली. त्यानंतर रात्री दोनच्या सुमारास नवरा झोपेत असताना भावनाने उठून किचनमध्ये तेल उकळून त्याच्या प्रायव्हेट पार्टवर गरम तेल ओतले. आता फरार झालेल्या भावनाचा शोध पोलीस घेत आहेत.

Related posts